आसनी ग्रामपंचायतीची बिनविरोधची परंपरा कायम

0




सातारा - आसनी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले , ज्ञानदेव रांजणे , सागर धनावडे

केळघर : वार्ताहर - आसनी गावाने सातत्याने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करत समाजात आदर्श निर्माण केला असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्परी सहकार्य करणार. असे प्रतिपादन आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले . 

           आ .छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य काळापासुन या गावाने बिनविरोधची परंपरा कायम राखली . यावेळी देखील सागर धनावडे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यात आली . 

     यावेळी सरपंच सौ. संजना जगन्नाथ शेलार यांना अडीच वर्षे तर पुढील अडीच वर्षासाठी सौ रत्ना संजय भिलारे यांची गावामधे एकमताने निवड करणेचे ठरले. उपसरपंचपदी सूर्यकांत दत्तात्रय शेलार तर सदस्यपदी सूर्यकांत विष्णु शेलार,आंनदी आनंदा शेलार,रत्ना संजय भिलारे ,फुलाबाई सुरेश इंगवले यांची बिनविरोध निवड कारणेत आली .


यावेळी आ. भोसले व ज्ञानदेव रांजणे यांच्या हस्ते सरपंच , उपसरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले . यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)