मेढा पोलीसांनी पकडला ५ लाख ७६ हजाराचा गुटख्यासह मुद्देमाल .

0

केळघर : वार्ताहर - मेढा पोलिसांनी गुटख्याची अवैध चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारे इसमावर मोठी कारवाई करून बेकायदेशीर गुटख्याचा मुद्देमाल व वाहन असा एकूण ५,७६,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला .
          सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख , सातारा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल , वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, यांनी अवैध व्यवसायांवर छापे टाकून कारवाई करणेच्या दिलेल्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली .
          कुडाळ ते पाचगणी रोडवरून एक इसम गुटखा व पान मसाला विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार आहे अशा आशयाची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत प्राप्त झाली. त्यानुसार तात्काळ मेढा स्टेशनकडील स्टाफचे सहाय्याने मिळाले बातमीचे अनुशंगाने सपोनि संतोष तासगांवकर हे सापळा लावून थांबले असता मिळालेल्या माहीती नुसार एक इसम पाचवड बाजुकडून पाचगणी बाजुकडे एक पांढरे रंगाची ऑक्टावीआ स्कोडा कार नं. एम.एच.१४.सी.सी. ६१६१ ही येताना दिसली असता त्याला सदरची कार थांबविणेबाबत इशारा केला असता ती न थांबविल्याने तिचा पाठलाग करून त्यास हुमगाव ता. जावली जि. सातारा गावचे हद्दीत न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज हुमगावचे समोर रोडवर पकडले. कारमधील इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव आकाश प्रकाश मोरे, वय ३२ वर्षे रा. विराटनगर, अमृतवाडी, ता. वाई, जि. सातारा असे सांगितले. त्यानंतर त्यास ताब्यात घेवून सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकुण ५६,०००/- रूपयांचा अवैद्य गुटखा आढळुन आल्याने सदरचा अवैद्य प्रतिबंधित गुटखा व वाहन असा एकुण ५,७६,०००/- रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेवुन जप्त करणेत आलेला असून सदर आरोपीविरूद्ध अन्न व सुरक्षा अधिकारी यांचे फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

       सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल , वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम , यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस हवालदार डी. जी. शिंदे, पोलिस नाईक शेख, पोलिस कॉन्स्टेबल सनी काळे, निलेश देशमुख, पोलीस पाटील आखाडे योगेश शिंदे यांनी केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)