केळघर : वार्ताहर -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( अजितदादा गट) सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम तर सरचिटणीसपदी श्रीनिवास शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सातारा येथे संपन्न झाली. ह्या बैठकी दरम्यान नूतन कार्यकारणीच्या पदाधिकारी निवडीचे अधिकार रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद आबा पाटील , आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. ना.अजित दादा पवार ,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणून तसेच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल, या .बैठकित अभिनंदन ठराव संमत करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकारणी सक्षम व भक्कम करण्याकरिता श्री. रामराजे नाईक निंबाळकर व आ.मकरंद आबा पाटील यांनी नूतन कार्यकारणी करिता व संघटना बांधणी करिता जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अमित गेणूजी कदम (जावली) व जिल्हा सरचिटणीस पदी श्रीनिवास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली .आ. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.
अमित कदम हे ना. अजित दादा पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात तसेच जिल्ह्याच्या संघटनात्मक समन्वय साधण्यासाठी श्रीनिवास शिंदे (तालुका वाई ) यांना नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. . श्रीनिवास शिंदे हे आ. मकरंद आबा पाटील यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या निवडीबाबतची घोषणा संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर केली. सदरच्या निवडीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
