माझी भूमिका.. माझी उमेदवारी - सौ माधुरी प्रविण गोरे

0

 

                    सौ माधुरी प्रविण गोरे

अपक्ष उमेदवार, कुडाळ जिल्हा परिषद उमेदवार



माझी भूमिका.. माझी उमेदवारी - सौ माधुरी प्रविण गोरे 



प्रतिनिधी : - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -  

कुडाळ गटाचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवूनच माझी उमेदवारी असून आनेवाडी ते बामणोली व सरताळे ते मोरावळे पर्यंतच्या  गावात विकास गंगा पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने व विश्वासाच्या बळावर मी या कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले असून गटातील गावा गावात रस्ते वीज पाणी हे मूलभूत प्रश्न मार्गी लावणे, त्याच बरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महिला म्हणून त्यांच्या पाठीशी येणाऱ्या काळात ठाम पणे उभी राहणार आहेच. 

          यासोबतच कुडाळ गटातील अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना विश्वासात घेऊन भविष्यातील माझी वाटचाल असणार आहे.माझे सासरे कै. शिवाजी अंबाजी गोरे हे आनेवाडी गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून काम पाहिले त्यांच्या कार्यकाळात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या साथीने अनेक विकास कामे गावात मार्गी लावली, तसेच जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून शेतकऱ्यांचे हात मजबूत करण्याचे काम बाजार समितीच्या माध्यमातून केले. सासरे कै. शिवाजी गोरे यांच्या समाजकार्याचा वारसा घेऊनच कुडाळ गटात मी काम करणार आहे

          ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विचार घेऊन मी या कुडाळ गटात मतदार बंधू भगिनींच्या साथीने पुढील वाटचाल करण्यासाठी लवकरच अपक्ष उमेदवार म्हणून नवीन चिन्हासह आपल्या समोर येत आहे, जनतेच्या विश्वासावर व सहकाऱ्यांच्या साथीने मतदार नक्कीच मला संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त करते व दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याची ग्वाही देते


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)