सायगाव गणात गाव भेटीने भाजपा उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात

0

 

रायगांव - येथे प्रचार प्रसंगी सौरभ शिंदे , जयश्री गिरी, सुहास गिरी , मच्छिन्द्र मुळीक ,राजेंद्र फरांदे, समाधान गायकवाड, धैर्यशील मोहिते अनिता गायकवाड, वैशाली फरांदे,अरुण ढवळे, सोन्या पवार, मनेष फरांदे , विवेक पवार आदि


सायगाव गणात गाव भेटीने भाजपा उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात 


 प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज  ) -


कुडाळ गटात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कडून जाहीर प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून.... सायगाव गणातील आनेवाडी रायगाव महामुलकरवाडी , मालुसरेवाडी या गावात सायगाव गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ चारुशीला विवेक पवार यांच्या प्रचारार्थ प्रतापगड सहकारी साखर करण्याचे चेअरमन सौरभ शिंदे, कुडाळ गटाच्या उमेदवार जयश्री गिरी, सुहास गिरी जावली बाजार समिती संचालक मच्छिन्द्र मुळीक यांच्या उपस्थितीत प्रचाराला शुभारंभ करण्यात आला 

            या गाव भेटी मध्ये घरो घरी उमेदवार भेटी देऊन आपली विकासासाठी असणारी भूमिका मतदारांच्या पर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असून, या गावातील मतदार ग्रामस्थांच्या पर्यन्त आपली भविष्यातील विकासात्मक वाटचाल कशी असेल हे सांगून या सायगाव गणात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बळावर विजय मिळविण्यासाठी सर्वांनी अहोरात्र परिश्रम घ्यावे असे आवाहन प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले 

     या गावातील भेटी प्रसंगी प्रतापगड कारखाना संचालक राजेंद्र फरांदे, रायगावचे उपसरपंच समाधान गायकवाड, धैर्यशील मोहिते अनिता गायकवाड,आनेवाडीच्या सरपंच वैशाली फरांदे,अरुण ढवळे, सोन्या पवार, जावली बाजार समिती संचालक मनेष फरांदे विवेक पवार यांची उपस्थिती होती

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)