जावली तालुक्यातील तीन जि प गटासाठी ९ तर सहा पंचायत समिती गणासाठी १४ उमेदवार रिंगणात
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा) -
जावली तालुक्यातील जि प गटातील १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर पं स साठी २५ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने तीन जि प साठी ९ तर सहा पंचायत समितीसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत .
म्हसवे जि.प. गटातून - अशोक रामचंद्र चव्हाण ,मिलींद रामचंद्र नलवडे - (उबाठा),दत्तात्रय किसन गावडे- - (अपक्ष ) ,सुरेश लक्ष्मण चव्हाण- (अपक्ष ) ,वैशाली दत्तात्रय पांगारे - (अपक्ष ), यांनी अर्ज मागे घेतले तर संदीप सर्जेराव पवार - (शिवसेना), वसंतराव मानकुमरे - (भाजपा) ,संतोष दिनकर शिराळे-(अपक्ष) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे .
कुडाळ जि प गटातून -माधुरी प्रविण गोरे- (अपक्ष),स्वप्नाली राहुल ननावरे - (अपक्ष ) ,कल्पना भानुदास फरांदे - (अपक्ष) ,मोनाली महेश बारटक्के- (अपक्ष ) ,प्रसन्ना आशिष रासकर - (अपक्ष),गीता लक्ष्मण लोखंडे - (अपक्ष ), यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले . तर जयश्री मनिलाल गिरी - (भाजपा), पूनम प्रशांत नायकूडे - ( राष्ट्रवादी), जयश्री संजय शेवते - (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल .
कुसुंबी जि प गटातून वनिता दिपक ओंबळे - (शिवसेना ) ,माया चंद्रकांत धनावडे -शिवसेना ( उबाठा ) , उषा सुर्यकांत उंबरकर ( २ ) (अपक्ष ) ,राजश्री वसंत शिंदे ( २ ) (अपक्ष ) , यांनी अर्ज मागे घेतल्याने कविता एकनाथ ओंबळे (शिवसेना ) , अर्चना ज्ञानदेव रांजणे (भा ज पा ), कल्पना गणपत पार्टे (अपक्ष ) , यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल .
तालुक्यात एकूण सहा गण असून यापैकी म्हसवे गणातून प्रतिभा प्रकाश परामणे , नीता निलेश शिंदे , वैष्णवी सुधीर करंदकर ,पुनम अविनाश दुर्गावळे , अरुणा अजय शिर्के , छाया विलास सुर्वे यांनी अर्ज मागे घेतल्याने रेश्मा समाधान पोकळे (भाजपा ), शिल्पा मिलिंद शिंदे (राष्ट्रवादी ) , संगीता दिनकर भिसे (अपक्ष) अशी तिरंगी लढत होणार आहे .
खर्शी बारामुरे गणातून विक्रांत महादेव गावडे शिवसेना (उ बा ठा ) विशात उत्तम सकपाळ - आरपीआय ( आठवले ),श्रीरंग रामचंद्र गलगले - (अपक्ष) , जगन्नाथ भानुदास गावडे - (अपक्ष ),समीर तुकाराम गोळे ,सुशिल विष्णु गोळे - (अपक्ष ) श्रीहरी तुकाराम गोळे ( अपक्ष) ,रविंद्र एकनाथ पार्टे ( अपक्ष ) , शंकर लक्ष्मण सणस ( अपक्ष) , यांना अर्ज मागे घेतले तर गोरखनाथ सिताराम महाडिक - ( भाजपा ) ,विठ्ठल गुलाबराव गोळे - ( राष्ट्रवादी - (श प ) , किरण हणमंत गायकवाड ( वंचित बहुजन आघाडी ), यांच्यात तिरंगी लढत होणार आहे .
कुडाळ गणातून - वनिता राहुल रोकडे , सोमनाथ लक्ष्मण कदम - (अपक्ष) ,धनंजय यशवंत केंजळे - (अपक्ष) ,विरेंद्र सुरेशराव शिंदे - (अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतला . प्रशांत मारुती तरडे -शिवसेना (उ बा ठा ) ,राजेंद्र रामचंद्र शिंदे - राष्ट्रवादी ( श प ) , सौरभ राजेंद्र शिंदे - (भा ज पा ) , राजेंद्र खाशाबा शेवते - (वचित बहुजन आघाडी ) यांच्या मध्ये चौरंगी लढत आहेत .
सायगांव पं स गणातून रेश्मा संतोष खरात , उज्वला जितेंद्र खरात - (अपक्ष) , वंदना सुहास भोसले - (अपक्ष ) , वैशाली चंद्रकांत सावंत ( अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतले तर साक्षी विजय देशमुख - राष्ट्रवादी ( श प ) ,चारुशिला विवेक पवार - (भा ज पा ) यांच्यामध्ये दुरंगी लढत होईल .
कुसुंबी पं स गणात - सुरेखा संतोष चव्हाण - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ,वैशाली साधू चिकणे , प्रणाली सुभाष माने,श्रेया समीर चव्हाण (अपक्ष) , लक्ष्मी चंद्रकांत चिकणे (अपक्ष) ,राजश्री वसंत शिंदे , (अपक्ष) ,सुरेखा दिलीप शेलार (अपक्ष ) यांनी अर्ज मागे घेतल्याने पुष्पा जगन्नाथ चिकणे (भा ज पा) , सुनिता विलास दुंदळे ( शिवसेना ) यांच्यात दुरंगी लढत होईल .
आंबेघर तर्फ मेढा गणात -संकेत दिलीप पाटील , जगन्नाथ लक्ष्मण शिर्के यांनी अर्ज मागे घेतल्याने आतिश संतोष कदम - (शिवसेना ),विजय बाबाजी सपकाळ (भा ज पा ) यांच्यात दुरंगी लढत होणार आहे . उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सर्व राजकीय पक्ष , अपक्ष उमेदवारांनी प्रचारासाठी गावोगावी , घरो -घरी सुरुवात केली आहे .

