कुसुंबी गटातील सूज्ञ मतदार कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सौ अर्चनाताई रांजणे यांना निवडून देतील

0

 

कुसुंबी गटातील सूज्ञ मतदार कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सौ अर्चनाताई रांजणे यांना निवडून देतील


 केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )-

 सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यातील प्रत्येक गाव , वाडी -वस्तीवर रस्ते , पाणीपुरवठा योजना , वीज आदि नागरी सुविधा मोठ्या प्रमाणात राबविल्या असून सूज्ञ मतदार नक्की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भाजपाच्या पाठीशी ठाम उभा राहिल असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे यांनी व्यक्त केला .

     कुसुंबी जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या उमेदवार अर्चनाताई रांजणे यांच्या प्रचारार्थ केळघर ,केडंबे परिसरात प्रचार दौरा करण्यात आला .यावेळी ते बोलत होते . यावेळी जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक रामभाऊ शेलार ,  जावली तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर धनावडे ,केळघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनिल जांभळे , माजी चेअरमन बबनराव बेलोशे , हरिभाऊ शेलार ,अर्जुन जाधव , सुर्यकांत रांजणे , बंडोपंत ओंबळे  , गणपत ओंबळे , प्रकाश ओंबळे , सुभाष शेलार , बापू शेलार ,जिल्हा डोंगरी विकास समितीच्या माजी सदस्या कविताताई धनावडे , जावली पंचायत समितीच्या माजी सभापती निर्मलाताई कासुर्डे , जयश्री शेलार आदि उपस्थित होते .

              यावेळी या परिसरातील केळघर , बोंडारवाडी भुतेघर , बाहुळे , तळोशी , वाळंजवाडी, केडंबे , पुनवडी , नांदगणे , वरोशी , वाहिटे , वाटंबे , मुकवली तसेच रेंगडी या गावात प्रचार दौरा करण्यात आला . यावेळी घरा -घरात भेटी देऊन उमेदवाराने तसेच कार्यकर्त्यांनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून भाजपाच्या कुसुंबी गटाच्या उमेदवार अर्चनाताई रांजणे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा डोंगरी विकास समितीच्या माजी सदस्या कविताताई धनावडे यांनी केले . 


  यावेळी गावा - गावात औक्षण करत उमेदवार अर्चनाताई रांजणे यांचे स्वागत करण्यात आले तर सौ रांजणे यांनीही गाव , वाडी वस्तीवरील लोकांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाणून घेत त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले . यावेळी गावा -गावातील सरपंच , उपसरपंच , महिला बचत गटाच्या सदस्या , युवक तसेच भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)