उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या -शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
शिवसेना म्हणजे संघर्ष , शिवसेना म्हणजे एक चळवळ आहे . आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे . तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कायम संघर्ष करत आलो आहे . जनतेचे प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या . असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी केले .
शिवसेनेचे कुसुंबी जि प गटाचे उमेदवार कविताताई ओंबळे , पंचायत समिती आंबेघर तर्फ मेढा गणाचे उमेदवार आतिष कदम, कुसुंबी गणाचे उमेदवार सुनिता दुंदळे यांच्या प्रचारार्थ कुसुंबी दक्षिण विभागातील सायळी , धनकवडी , काळोशी , करंडी , मालचौंडी , दुंद , कुसुंबी , गांजे , लिगाडेवाडी , मोहाट आदि गावे , वाड्या वस्त्यांवर प्रचार दौरा केला .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे म्हणाले , प्रस्थापित भाजपाच्या विरोधात ही जनशक्ती एकवटली आहे . सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी . त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी दोन्ही शिवसेना , राष्ट्रवादीसह इतर पक्ष एकत्र येऊन लढा देत आहोत . त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे . आरोग्यदूत , सामाजिक कार्यकर्ते एकनाथ (दादा) ओंबळे यांच्या निस्वार्थी समाज कार्यामुळे माझा विजय निश्चित आहे . असे शिवसेनेचे उमेदवार कविताताई ओंबळे यांनी सांगितले .
कुसूंबी दक्षिण विभागातील गावा गावात , घरात कार्यकत्यांनी पत्रके वाटत आपले मत शिवसेनेला , आपले मत धनुष्य बाणाला असे पटवून देत उमेदवारांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या . यावेळी गावागावात स्वागत करण्यात आले . ग्रामस्थ , महिला , युवक उपस्थित होते .


