केडंबे - येथील सभेत बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले.समवेत सदाशिव सपकाळ,ज्ञानदेव रांजणे, अर्चना रांजणे आदी.
बोंडारवाडी धरण प्रकल्प केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करतील
विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) -
राजकारणात दिलेला शब्द पाळणे खूप महत्वाचे असते .अशी शिकवण कै. भाऊसाहेब महाराज यांनी मला दिली आहे.मी जावळी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे सलग चार वेळा याच जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. बोंडारवाडी धरण प्रकल्प संदर्भात विरोधक निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या मनात माझ्या भूमिकेविषयी संभ्रम व गैरसमज निर्माण करत आहेत. बोंडारवाडी धरण प्रकल्प केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करतील याची पूर्ण खात्री असून विरोधकांकडे जनतेला सांगण्यासाठी काहीच नाही आणि विकासकामे करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
जावळी तालुक्यातील कुसुंबी गटातील भाजपच्या उमेदवार अर्चना रांजणे, आंबेघर गणाचे उमेदवार विजय सपकाळ, कुसुंबी गणातील उमेदवार पुष्पा चिकणे यांच्या प्रचारार्थ केडंबे येथे आयोजित कोपरा सभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, सुशांत कांबळे, रिकी तिवाटने, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, आनंदराव सपकाळ , निर्मला कासुर्डे, बबनराव बेलोशे, सागर धनावडे,कविता धनावडे, बंडोपंत ओंबळे, जयश्री शेलार, शिवाजीराव मर्ढेकर, दत्तात्रय पवार, विठ्ठलराव देशमुख , बळवंत पाडळे, विकास ओंबळे आदींची उपस्थिती होती.
ना भोसले यांचे भाषण चालू असताना अचानक लाईट गेली यावेळी उपस्थित जनसमुदायाने मोबाईल टॉर्च चालू केल्या .
ज्ञानदेव रांजणे म्हणाले, जावळी तालुक्यातील सर्वच विकासकामे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनीच केली असून भविष्यात ही राहिलेली कामे तेच पूर्ण करणार आहेत त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेऊन मंत्री भोसले यांची राजकीय ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी विविध गावचे सरपंच, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान यावेळी ना भोसले यांची कुसुंबी व म्हावशी याठिकाणी रात्री उशिरा सभा संपन्न झाली .



