मुकवली माची -अपघात ग्रस्त मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची झालेली अवस्था
केळघर घाटात मालवाहू ट्रकचा अपघात चालक ठार
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - केळघर घाटात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुकवली माची गावच्या हद्दीत ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे.
मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रोहा येथून साताऱ्याकडे माल वाहतूक करणारा ट्रक क्रमांक k A28 C A 5568 चालक आजीनाथ नागरगोजे रा. बीड वय 32 हे केमिकल पावडर घेऊन निघाले होते. केळघर घाटात मुकवली माची हद्दीत एक अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक नागरगोजे यांचा मृत्यू झाला.
मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, अश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स, रेंगडी व मुकवली माची येथील ग्रामस्थांच्या मदतीने अपघात ग्रस्त ट्रकमधील चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.अपघात एवढा भीषण होता की ट्रकची पुढील बाजू पूर्णपणे दबली होती. केबिनमध्ये चालक अडकून पडून तेथेच चालकाचा मृत्य झाला. केळघर घाटात नागमोडी व अवघड वळणे असून वाहन चालकांना वळणाचा अंदाज न आल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे . रस्त्याच्या सुरक्षित उपाय योजनांबाबत बांधकाम विभागाच्या डोळ्यावर पट्टी असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य त्या उपाय योजना करणे आवश्यक आहे.

