साधता संवाद, संपतील वाद.. न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड

0

 


साधता संवाद, संपतील वाद.. न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

 मा. ना. सर्वोच्च न्यायालय मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार मेढा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन न्या. डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले . सदर लोक अदालती मध्ये न्यायालया मधील दिवाणी व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्या मध्ये एकूण एकूण २५ प्रकरणाचा समोपचाराने निपटारा करून एकूण ४२८०४२/- रु ची वसुली झाली.

सुरुवातीला लोकन्यायालयाचे उद्घाटन मेढा न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ चतुर्थ श्रेणी कर्मचारी कोंडीबा धोंडिबा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी सातारा येथील ९ वे सह. दिवाणी न्यायाधीश डॉ. संगीता विक्रम आव्हाड, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश श्री एम. एस. शितोळे साहेब व ८ वे सह दिवाणी न्यायाधीश एन. एम शितोळे मॅडम , सहा. पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील मॅडम मेढा पोलीस स्टेशन, अतिरिक्त गट विकास अधिकारी श्री आर एस जगताप, जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र पोफळे, सहा सरकारी अभियोक्ता श्रीनिवास कणसे तसेच महाराष्ट्र बँक, बडोदा बँक, एस. बी. आय. बँक चे मॅनेजर यावेळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सदर लोकन्यायालयाच्या पॅनलवर मा. डॉ. विक्रम आव्हाड साहेब व श्री ॲड. विवेक देशमुख यांनी कामकाज पाहिले. सदर लोकन्यायालयात डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांनी स्वप्रेरणेने ज्या प्रकरणामध्ये तडजोड झाली, त्यांना सोलर बल्बची भेट देऊन त्यांना आनंदाचा धक्का दिला.

लोकन्यायालय हा आप-आपसात समजस्यांने वाद संपुष्टात करण्यासाठी एक प्रभावी माध्यम असून लोकांनी लोकासाठी लोकांच्या हितासाठी भरविण्यात येते असे मत व्यक्त केले. सदर लोकन्यायालयात दिवाणी, फौजदारी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८, कौटुंबिक प्रकरण, दिवाणी प्रकरणे, बँकिंग विषयी वसुलीच्या केसेस, दखलपूर्व प्रकरणात ग्रामपंचायत विभाग इत्यादी प्रकारच्या प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आलेल्या होत्या.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे CIS प्रणाली मधील गुन्हा कबूल या मथळ्याखाली पहिल्यांदाच संक्षिप्त प्रकरणात डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली निकाली करण्यात आल्या. सर्वच पक्षकारांनी चांगले सहकार्य केलेले असून त्यांना मा. डॉ. विक्रम आव्हाड साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि केसेस जास्तीत जास्त तडजोड करण्याचा प्रयत्न केला.

तसेच लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जावली तालुका वकील संघाचे ॲड. अनिल देशमुख, ॲड. विशाल महाडिक, ॲड.सतीश शिंदे, ॲड.आरती शेटे, ॲड.पूनम गोरे इत्यादी वकील वर्ग तसेच मेढा न्यायालयातील कर्मचारी वर्ग सहाय्यक अधीक्षक संदीप मोरे, संभाजी पालखे, प्रशांत लिंगडे, महेश पवार , काजल ओंबळे, कोंडीबा शिंदे, अश्विनी करंजेकर विधी स्वयंसेवक ऋषिकेश शिंदे, श्रावणी काशीलकर, पंकज मगदूम , कोर्ट कॉन्स्टेबल सागर मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)