नांदगणे - व्यावसायिकांना प्लास्टिक बंदीबाबत नोटीस देऊन जनजागृती करताना शुक्राचार्य साळुंखे व कर्मचारी
नांदगणे गावामध्ये प्लास्टिक वापरावर बंदी
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा ) -
मौजे नांदगणे ( ता . जावली ) येथील सर्व व्यवसायिकांना प्लास्टिक , थर्माकोल याचा वापर टाळावा व विक्री करू नये . व्यवसायिक व नागरिकांनी आपण दैनंदिन वापरत असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमाद्धवारे दि. २३/०३/२०१८ पासून संपुर्ण राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा विस्ताराधिकारी अमित पवेकर यांनी केले आहे .
यावेळी ग्राम अधिकारी शुक्राचार्य साळुंखे म्हणाले, यामध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या, थर्माकोल व प्लास्टिक पासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणा-या डिस्पोजेबल वस्तू (ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाटी, चमचे),हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगसाठी वापरले जाणारे भांडी व वाटी,द्रव पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टीक पाऊच/कप ,५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीची प्लास्टिक पिशवी इत्यादी बंदी असलेले प्लास्टीक पिशव्या उत्पादन वापरणाऱ्यास ५०००/- रु. दंड दुसऱ्यादा १०,०००/- रु. दंड आणि तिसऱ्यादा गुन्हा केला तर २५०००/- रु.दंड आणि तीन महिन्यापर्यंत शिक्षेची तरतुद आहे. तरी गांवातील सर्व व्यवसायीकांनी प्लास्टीक पिशव्या ऐवजी कापडी व कागदी पिशव्याचा वापर करावा. आणि प्लास्टीकचा वापर टाळावा व गांव प्लास्टीकमुक्त करण्यास हातभार लावावा. दि .२३/६/२०१८ पासून आपण प्लास्टीक पिशव्या, उत्पादने यांचा वापर करताना आढळून आल्यास आपणा विरुध्द ग्रामपंचायती मार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे . यावेळी ग्राम अधिकारी शुक्राचार्य साळुंखे, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण खाडे , शैलेश पार्टे , दिपक शिंदे यांनी परिश्रम घेतले .

