मामुर्डी - ग्रामस्थांना मोफत रोप वाटप प्रसंगी सदाशिव सपकाळ. समवेत विष्णू धनावडे, विश्वनाथ धनावडे, दत्तात्रय धनावडे आदी
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आंबे रोपांचे वाटप
मामुर्डी येथील युवकांनी सुरु केली पर्यावरण संवर्धनाची चळवळ
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - मामुर्डी ( ता जावली ) गावातील नितीन धनावडे, महेश धनावडे, तुकाराम धनावडे, प्रशांत धनावडे, नवनाथ धनावडे, अमोल भिलारे या तरुणांनी विष्णू आप्पा धनावडे (सहाय्यक आयुक्त, नवी मुंबई महानगर पालिका) यांच्या मार्गदर्शनाखाली "चळवळ पर्यावरण संवर्धनाची" उपक्रम सुरू केला. मागील वर्षभरात ज्यांचे वाढदिवस झाले. त्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून त्या नागरिकांकडून स्वेच्छेने देणगी स्वरूपात निधी जमा करून, रत्नागिरी केशर या जातीच्या 200 रोपांचे वाटप नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार सदाशिव सपकाळ तसेच सरपंच जगन्नाथ धनावडे, डी.एम.के.जावली बँकेचे संचालक विश्वनाथ धनावडे, नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त विष्णुआप्पा धनावडे , नायब तहसीलदार दत्तात्रय धनावडे , ग्रामपंचायत अधिकारी शंकरराव जाधव, कृषी अधिकारी विलास कदम, श्री.बर्गे श्री., धुमाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
*उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रामुख्याने माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ यांनी राजकारण विरहीत काम करून सर्व ग्रामस्थांनी एकमेकांच्या हातात हात घालून गावाच्या विकासासाठी काम करावे. यापुढील काळात दरवर्षी अधिकाधिक वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन करावे. "चळवळ पर्यावरण संवर्धनाची" या उपक्रमाचे कौतुक करून ग्रामस्थ आणि तरुणांचे अभिनंदन केले. विलास कदम यांनी कृषी विषयक मार्गदर्शन केले. तर विष्णू आप्पा धनावडे यांनी पुढील वर्षी प्रत्येक कुटुंबाला किमान 10 रोपे वितरित करू असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी गावातील काही शेतकऱ्यांची जमीन 1992 साली एम.आय.डी.सी.ने आरक्षित केली होती. सातबारा वरील शेरा कमी करण्यासाठी ज्यांनी 33 वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आणि सातबारा वरील भूसंपादनाचा शेरा कमी झाला. यामध्ये प्रामुख्याने नायब तहसीलदार दत्तात्रय धनावडे , नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त विष्णुआप्पा धनावडे , माजी सरपंच पांडुरंग धनावडे, माजी सरपंच बापूसाहेब धनावडे, माजी . पोलीस पाटील सुरेश धनावडे यांचा माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्ञानेश्वर धनावडे, आनंदशेठ धनावडे, शांताराम धनावडे, ज्ञानदेव भिलारे, नाथ्याबा धनावडे, सुरेश धनावडे दत्तात्रय धनावडे, पांडुरंग धनावडे, अशोक धनावडे, दादू धनावडे, विजय धनावडे, पांडुरंग जाधव, वसंत धनावडे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नितीन धनावडे, सागर धनावडे, सचिन धनावडे, सुभाष भिलारे, सुशांत धनावडे, ज्ञानेश्वर धनावडे, नयन धनावडे, राहुल धनावडे, अक्षय धनावडे, विशाल धनावडे, सद्गुरू धनावडे, सुशांत मोरे, सोपान लोहार या तरुणांनी परिश्रम घेतले
अजय धनावडे यांनी सूत्रसंचालन केले. संपतराव धनावडे यांनी प्रास्तविक केले.


