मेढा - कारवाईमध्ये सहभागी झालेले सपोनि सुधीर पाटील व पोलीस कर्मचारी
मेढा पोलीस स्टेशनची धडक कारवाई
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
मेढा पोलीस स्टेशन येथील बलात्काराच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीला सांगली जिल्ह्यातून केले जेरबंद . फरारी व पाहीजे असलेल्या आरोपीचे शोध मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मेढा पोलीस ठाणेचे एक विशेष पोलीस पथक तयार करून त्यांना फरारी व पाहीजे असले आरोपींचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे मेढा पोलीस ठाणेत दाखल असले गुन्हा रजि.नं. ९६/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६(३) ३६६,३४ सह बाल. लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,६,८,१२ प्रमाणे दि.०८/०६/२०२४ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्यामधील फिर्यादी यांची मुलगी अ.ब.क. वय १३ वर्षे, ९ महिने हिस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अज्ञानाचा फायदा घेवुन तिला पळवून नेहून तिचेशी तिचे इच्छेविरुद्ध जबरीने शरीरसंबंध केले बाबत गुन्हा रजि. दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील पिडीत मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुद्धा आरोपी कुणाल जगदिश कांबळे वय २१ वर्षे, रा.कुमठे ता. तासगांव, जि. सांगली याने गुन्ह्यातील मुख्य आरोपी यास गुन्हा करणेकरीता आरोपी व पिडीत मुलगी यांना आश्रय देवून गुन्ह्यास सहकार्य केलेले आहे. सदर आरोपी हा गुन्हा घडले नंतर सुमारे एक वर्षापासून फरारी झालेला होता. त्याचा वेळोवेळी खास बातमीदारामार्फत शोथ घेतला. परंतु तो मिळून येत नव्हता. सदर फरारी आरोपीचे ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने पोलीस ठाणेचे खास पोलीस पथक तयार करून सदर आरोपीस मौजे कुमठे ता. तासगांव जि. सांगली येथून दि.०७/०६/२०२५ रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हात अटक केलेली आहे.
सदर कारवाई मध्ये सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलीस उप-निरीक्षक गंगावणे, पो.ना. बेसके ब.नं.२६८४, पो.कॉ. काळे ब.नं.२५२६, पो.कॉ. वाघमळे ब.नं.१२२८, पो.कॉ. मोरे ब.नं. १२६३ यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे. सदर कामगीरीबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर , वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.