युवकांनी कर्तृत्वाबरोबरच दातृत्वाचे गुण अंगी बानावेत ; युवा उद्योजक सुरेश वाडकर यांचे सामाजिक कार्य युवकांना प्रेरणादायी - रामभाऊ शेलार

0

केळघर - आरोग्य केंद्रात फळे वाटप प्रसंगी रामभाऊ शेलार,मोहनराव कासुर्डे ,  डॉ केदार कुलकर्णी , रविंद्र सल्लक , बबनराव बेलोशे , अंकुश बेलोशे , मारुती पार्टे आदि


युवकांनी कर्तृत्वाबरोबरच दातृत्वाचे गुण अंगी बानावेत ; युवा उद्योजक सुरेश वाडकर यांचे सामाजिक कार्य युवकांना प्रेरणादायी - रामभाऊ शेलार


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -


मुंबई- पुणे आदि शहरामध्ये नोकरी , व्यवसायानिमित्त गेलेल्या अनेक युवकांनी प्रगती साधली आहे . युवकांनी कर्तृत्वा बरोबरच दातृत्वाचे गुण अंगी बानावेत असेच एक  युवा उद्योजक कायम समाजहितासाठी झटणारे सुरेश वाडकर यांनी आपल्या प्रगती बरोबरच ग्रामीण भागातील जनतेशी असलेली नाळ कायम ठेवली असून इतर युवकांनी त्यांची प्रेरणा घ्यावी असे आवाहन जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक रामभाऊ शेलार यांनी केले .
         केळघर ( ता जावली ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुरुळोशी गावचे युवा उद्योजक सुरेश वाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी विभागाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे , वैद्यकिय अधिकारी डॉ केदार कुलकर्णी , माजी सरपंच रविंद्र सल्लक , केळघर विकास सोसायटीचे माजी चेअरमन बबनराव बेलोशे , भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अंकुश बेलोशे , मारुती पार्टे आदिंची प्रमुख उपस्थिती होती .



       यावेळी मोहनराव कासुर्डे म्हणाले , युवा उद्योजक सुरेश वाडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले आहे .त्यामुळे त्यांना समाजाविषयी काहीतरी करण्याची तळमळ आहे . ते कायम सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करत असतात हे कौतुकास्पद आहे .
     यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णासाठी फळे वाटप करण्यात आले . प्रारंभी रविंद्र सल्लक यांनी स्वागत केले . तर डॉ . केदार कुलकर्णी यांनी आभार मानले . यावेळी परिसरातील नागरिक , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)