पंजाब -30 व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय प्रतियोगिता विजेती महाराष्ट्र टीम
नॅशनल बेसबॉल स्पर्धेत जावलीच्या सचित मर्ढेकरची बाजी
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
संगरूर पंजाब येथे 30 सब ज्युनिअर नॅशनल बेसबॉल स्पर्धा 27 मार्च ते 31 मार्च अखेर संपन्न झाली . त्यामध्ये जावळी तालुक्यातील जवळवाडी गावचा सचित शंकरराव मर्ढेकर हा महाराष्ट्र संघातून खेळला. अंतिम सामन्यात पंजाब विरुद्ध महाराष्ट्र अशी लढत झाली. त्यामध्ये महाराष्ट्र संघाने विजय संपादन केला.
जवळवाडी सारख्या छोट्या गावातून जाऊन महाराष्ट्र संघात निवड होणे ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. सचित हा बालमोहन विद्यामंदिर दादर या शाळेचा विद्यार्थी असून त्याला अशोक सरोदे सर आणि तन्मय ओंकार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सचित हा वेण्णा निरंजना सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन शंकरराव मर्ढेकर यांचा चिरंजीव आहे .
सचितच्या या यशाबद्दल प्रा. प्रकाश जवळ म्हणाले, "जवळवाडीसारख्या छोट्या गावातून जाऊन महाराष्ट्र संघात निवड होणे ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. सचितने जावळी तालुक्याचा नावलौकिक देशभरात करावा."
या यशाबद्दल त्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जवळवाडीच्या सरपंच सुरेखा मढेंकर, सतीश मर्ढेकर, सुनील देशमुख, विकास देशमुख ,संतोष वारागडे, श्रीरंग जवळ, शंकर जवळ, पांडुरंग जवळ, आनंद जवळ, अनिल कदम ,सूर्यकांत जवळ, बाबू जवळ, तुकाराम जवळ , रोहिदास दुंदळे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.