मेढा - पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या समवेत राजेंद्र चोरगे , राजेंद्र मोकाशी, श्रीधर साळूंखे व मान्यवर
वाचनालये ही माणसं घडविण्याचा कारखाना आहेत .... !
-राजेंद्र चोरगे
महात्मा गांधी वाचनालयाचा मानाचा " जलनायक "स्व.विजयराव मोकाशी "जलरत्न पुरस्कार " नारायण सुर्वे यांना तर " जीवन गौरव पुरस्कार " पांडुरंग देशमुख गुरुजी यांना बहाल
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
मोबाईलच्या जमान्यात पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष होत असले तरी नियमीत काहीतरी चांगले वाचले पाहिजे. वाचनालये ही माणसं घडविण्याचे कारखाने असून ती जीवंत राहीली पाहिजेत. असे आवाहन बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केले.
म. गांधी वाचनालयाचे वतीने आयोजीत केलेलेल्या पुरस्कार वितरण समारंभा प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. वाचन चळवळीसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी राजेंद्र चोरगे यांनी दिले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी हे होते. यावेळी व्याख्याते श्रीधर साळूंखे , सुर्यकांत देशमुख , कांतीभाई देशमुख , बबनराव वारागडे, प्रा . तुकाराम ओंबळे, मुरलीधर काशिलकर शेठ, आदिनाथ ओंबळे , प्रथमेश क्षीरसागर , प्रियांका किर्वे, अंगणवाडी पतसंस्थेच्या चेअरमन सौ .सुनिता पार्टे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना राजेंद्र मोकाशी म्हणाले, मेढा केळघर परिसरातील सर्वसामान्य नागरीकाचे जीवनमान उंचावे यासाठी स्व. विजयराव मोकाशी यांनी बोंडारवाडी धरणाचे स्वप्न पाहिले . शांत ,संय्यमी व मनमिळावू स्वभाव त्यांचा होता . त्याचे बालपणापासूनचे ५५ वर्षाचे सहकारी नारायणशेठ सुर्वे यांना जलनायक स्व. विजयराव मोकाशी "जलरत्न पुरस्कार " देवून सन्मानित केले ही त्यांच्या कार्याची पोहोच पावती आहे. गांधी वाचनालयाचे कार्य अत्तम असून आपले नेहमीच सहकार्य राहील असे श्री . राजेंद्र मोकाशी यांनी सुचित केले.
श्रीधर साळूंखे सर यावेळी बोलताना म्हणाले, बहुजन समाजासाठी तळागाळात काम करणाऱ्यांचा म. गांधी वाचनालयाने विविध पुरस्कार देवून सन्मान केला ही कौतुकाची बाब आहे . यामुळे अधिक काम करण्याची उर्जा मिळते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याकडील जमा पूंजी पैकी काही धन विधायक कार्यासाठी खर्ची केले पाहिजे. असे सुचित केले.
यावेळी सौ. जयश्री माजगांवकर , सोमनाथ काशिलकर, सौ . शितल करंजेकर , शाहिर नारायण कदम, नारायण सुर्वे यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाचे कौतुक केले.
जावली तालुक्यामध्ये ग्रंथालय चळवळीमध्ये अग्रेसर असणाऱ्या महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा (तालुका अ वर्ग )या संस्थेच्या वतीने समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येतो.यावर्षी संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक / अध्यक्ष -राजेंद्र चोरगे व मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त -राजेंद्र मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या सौ .विजयाताई थत्ते सभागृहामध्ये करण्यात आले होते .
सन 2025 सालासाठीचा चालू वर्षीचा मानाचा जलनायक स्व. विजयराव मोकाशी . " जलरत्न पुरस्कार " नारायणशेठ सुर्वे यांना तर "जीवन गौरव पुरस्कार "पांडुरंग महादेव देशमुख (गुरुजी) यांना मान्यवरांचे हस्ते बहाल करण्यात आला . त्याचबरोबर कै.शामराव शिरसागर ( माजी अध्यक्ष ) जिल्हास्तरीय "आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार " लक्ष्मण घाडगे -श्री खंडू आई देवी मोफत वाचनालय म्हावशी ,जि.सातारा ,स्व. मंदाकिनी ओंबळे -"जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार "-. नीलिमा आडके -जि .प .शाळा बेलोशी यांना ,त्याचबरोबर स्व. महादेव जंगम ( मा. ग्रंथपाल) " जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार " -बाबासाहेब गाडे -पद्मश्री ग .गो .जाधव सार्वजनिक वाचनालय यशवंत नगर वाई यांना तर स्व. मंदाकिनी ओंबळे " जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार " -शाहीर नारायण कदम धोंडेवाडी ता. खटाव ,स्व.इंदुमती मोकाशी यांचे स्मरणार्थ " तालुकास्तरीय आदर्श माता पुरस्कार " श्रीमती सुंदराबाई कारंडे वरोशी ता. जावली,कै.लक्ष्मण काशीलकर (दादाशेठ ) यांच्या स्मरणार्थ " यशस्वी उद्योजक पुरस्कार "नामदेव वांगडे -कौस्तुभ पेट्रोलियम यांना तर स्व.जनाबाई पार्टे यांचे स्मरणार्थ " आदर्श माता पुरस्कार "सौ . रंजना करंजेकर वश्रीमती सुनिता गोरे यांना ,स्वर्गीय सावित्री थत्ते " आदर्श महिला वाचक पुरस्कार " सौ .अनिता जाधव ,श्रीमती नीता झेंडे ,सौ . मयुरी चव्हाण यांना मान्यवरांचे हस्ते वितरीत करून सन्मान करण्यात आला. तर सौ. जयश्री माजगांवकर, अॅड . निलम पवार , जावेद शेख ,मारूती देशमुख , संजय सुर्वे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून सदर पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन संस्थेच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी पुरस्कार दाते ,पुरस्कार प्राप्त व्यक्ती , त्यांचे नातेवाईक संस्थेची हितचिंतक ,सभासद, सल्लागार , बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी , ग्रामस्थ , अंगणवाडी सेविका बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुरेश पार्टे , कार्याध्यक्ष नारायण शिंगटे, सचिव धनंजय पवार, सहसचिव प्रकाश परांजपे , रघुनाथ जवळ , अशोक दिक्षीत, विठ्ठल देशपांडे, सौ. शोभा शेडगे, श्रीमती नंदा काशिलकर, सौ. रूपाली वारागडे, सौ. शैला सपकाळ, सौ. स्वाती दिक्षीत , ग्रंथापाल सौ. आशा मगरे, सहा. ग्रंथपाल इमताज शेख, , सौ . माधवी कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार कार्याध्यक्ष नारायण शिंगटे यांनी मानले.
या कार्यक्रमा प्रसंगी राजेंद्र चोरगे, राजेंद्र मोकाशी , सुर्यकांत देशमुख, नारायणशेठ सुर्वे , सौ . शितल करंजेकर , योगेश करंजेकर यांनी संस्थेचे आजीव सभासदत्व स्विकारले.

