एकनाथ दादा ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार, निराधार, गोरगरिब महिलांना ब्लँकेट वाटप

0

 


एकनाथ दादा ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार, निराधार, गोरगरिब महिलांना ब्लँकेट वाटप


केळघर : वार्ताहर - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

राजकारण समाज हितासाठी, आपला माणूस आपल्यासाठी याप्रमाणे कायम झटणारे शिवसेना ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ) सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ दादा ओंबळे यांचा वाढदिवस, अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि.06/10/2024 रोजी सायंकाळी 05 वाजता नक्षत्र मंगल कार्यालय मेढा येथे विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत व विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न होत आहे .

       यावेळीमा.ना.श्री. शंभूराज देसाई (उत्पादन शुल्क मंत्री महा:राज्य तथा पालकमंत्री, सातारा व ठाणे जिल्हा) मा.आ.श्री.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले , मा. आ . सदाशिव भाऊ सपकाळ ,जेष्ठ विचारवंत.श्रीधर साळुंखे सर आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .

     यावेळी इ .10 वी आणि इ . 12 वी तील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार, निराधार, गोरगरिब महिलांना ब्लँकेट वाटप तसेच शासकीय सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे . तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन एकनाथ दादा ओंबळे मित्र समूह यांच्यावतीने करण्यात आले आहे .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)