मेढा - तलाठी संघटनेच्या पदाधिकारी निवडीवेळी उपस्थित संदीप ढाकणे. समवेत सागर माळेकर, बाळासाहेब करचे, सुरज माळी आदी
जावळी तालुका तलाठी व मंडलाधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी तलाठी संदीप ढाकणे यांची निवड
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
जावळी तालुका तलाठी व मंडलाधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी वरोशी सजाचे तलाठी संदीप ढाकणे यांची तर उपाध्यक्षपदी सागर माळेकर यांची तर सरचिटणीस पदी बाळासाहेब करचे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज मेढा येथील तलाठी संघटनेच्या कार्यालयात संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी संघटनेची बैठक सेवानिवृत्त मंडलाधिकारी अनिस मेमन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते जावळी तालुका तलाठी-मंडलाधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी वरोशी सजाचे तलाठी संदीप ढाकणे यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या उर्वरित पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे:उपाध्यक्ष सागर माळेकर. सरचिटणीसपदी बाळासाहेब करचे, कार्याध्यक्षपदी सुदर्शन आशिवकर तर सहसरचिटनिस पदी सुरज माळी यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष संदीप ढाकणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संघटनेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.