शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे -विशाल वाळुंजकर

0


 आंबेघर - मार्गदर्शन करताना विशाल वाळुंजकर, श्री काळेकर , विठ्ठल देशपांडे, एकनाथ ओंबळे ,ज्ञानदेव रांजणे , रामचंद्र शेलार, मोहनराव कासुर्डे , बबनराव बेलोशे , सागर धनावडे , सुनिल जांभळे

 

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे -विशाल वाळुंजकर




  केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )-

       सातारा - जावली विधानसभा मतदारसंघ हा छ .शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असल्याने येथील त्यांचे वशंज उमेदवार शिवेंद्रसिंहराजे हेच स्ट्रार आहेत . त्यामुळे येथे कोणत्याही स्टार प्रचारकाची आवश्यकता नसून त्यांच्या मोठ्या फरकाचे मताधिक्य वाढण्यासाठी प्रत्येक गावात, बूथवर लक्ष ठेवून प्रत्येक ग्रामस्थांनी काम करावे . असे आवाहन भाजपचे सातारा जिल्हा विस्तारक विशाल वाळुंजकर यांनी केले .

        आंबेघर ( ता जावली ) येथे सातारा जावली विधानसभा भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक पार पडली . यावेळी ते बोलत होते . यावेळी सातारा नगरपालिकेचे नगरसेवक श्री काळेकर , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे , जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे ,रामचंद्र शेलार, मोहनराव कासुर्डे , बबनराव बेलोशे ,युवा अध्यक्ष सागर धनावडे , सोसायटीचे चेअरमन सुनिल जांभळे ,राजेंद्र गाडवे, बंडोपंत ओंबळे, प्रशांत जुनघरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती .

     यावेळी श्री . वाळुंजकर म्हणाले , शिवेंद्रसिंहराजेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे यासाठी सर्वानी एकजूटीने प्रयत्न करावेत . प्रत्येक बूथ अध्यक्षांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे . आपण विक्रमी मताधिक्यासाठी कार्यरत राहा . प्रत्येकांने साखळी तयार करून गाव, वाडी - वस्तीवर शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत.

     यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील कामानिमित्त बाहेर असणाऱ्या लोकांचे योग्य नियोजन करून त्यांना मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे . तर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथद ओंबळे म्हणाले सातारा - जावली विधान सभा मतदार संघामध्ये प्रत्येक बूथवर , मतदारापर्यंत पोहचण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन सर्व पक्षीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे . त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला मिळविता येईल .

     प्रत्येक बूथवर शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार

      आंबेघर गणातून जास्तीत जास्त मतदान करून १००% मतदान भाजपा महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना करणेचा संकल्प आणि तसे नियोजन सदर बैठकीमध्ये करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते , बूथ प्रमुख , गाव प्रमुख, आजी - माजी सरपंच उपस्थिती होते . दरम्यान यावेळी गणातील बोंडारवाडी , मुकवली व म्हाते येथील बूथंना भेटी देऊन मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले 




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)