कुसुंबी - गणेशोत्सवानिमित्त भेटी प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सोबत ज्ञानदेव रांजणे , मोहनराव कासुर्डे , रामभाऊ शेलार , सागर धनावडे , सुनिल जांभळे , बबनराव बेलोशे , विकास ओंबळे , मारुती चिकणे मंडळाचे कार्यकर्ते
शाश्वत विकासकामांमुळे निवडणुकीची काळजी करत नाही. जावलीतील जनतेने यापुढेही अशीच साथ द्यावी . आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन;
जावली तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांना भेटी
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
जावळी तालुक्यातील जनतेने नेहमीच आमदार म्हणून साथ दिली आहे. मतांचे राजकारण न करता तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक ती विकासकामे केली आहेत. जावळीतील सर्वसामान्य जनता नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, त्यामुळे निवडणुकीत कोणीही समोर येऊ द्या शाश्वत विकासकामांमुळे निवडणुकीची काळजी करत नाही.जावलीतील जनतेने यापुढेही अशीच साथ द्यावी, तालुका राज्यात विकासकामांच्या बाबतीत आघाडीवर ठेवण्यासाठी आमदार म्हणून प्रयत्न करेन अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
जावळी तालुक्यातील केळघर व कुसुंबी परिसरातील गणेशोत्सवा निमित्त आमदार भोसले यांनी भेटी दिल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते . यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , मोहनराव कासुर्डे , रामभाऊ शेलार , सागर धनावडे , केळघर सोसायटीचे अध्यक्ष सुनिल ( नाना ) जांभळे , माजी अध्यक्ष बबनराव बेलोशे , केडंबेचे माजी सरपंच बंडोपंत ओंबळे , विकास ओंबळे , कुसुंबीचे सरपंच मारुती चिकणे , डांगरेघर सरपंच अमोल आंग्रे आदिंची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे म्हणाले , निवडणुका आल्या की विरोधकांना जनतेची आठवण येते. मात्र जावळी तालुक्यात अतिवृष्टीचे अस्मानी संकट आले,कोरोना महामारी आली त्यावेळी सर्वात आधी आमदार शिवेंद्रसिंहराजे तालुक्यातील जनतेच्या मदतीला धावले होते. या वेळेस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना राज्यात क्रमांक एकचे मताधिक्य मिळवून द्यायचा निर्धार तालुक्यातील जनतेने केला आहे.
यावेळी आमदार भोसले यांनी केडंबे , केळघर , नांदगणे , वरोशी , सावली , कुसूंबी , म्हाते , मोहाट , गांजे , करंडी आदि गावातील गणेश मंडळांना भेटी देत शुभेच्छा दिल्या . यावेळी केडंबे येथील गणेश मंडळांना भेट दिली . तर वरोशी येथील भेटी प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते तेजस कासुर्डे , सुरेश कासुर्डे सरपंच विलास शिर्के , बाजीराव कासुर्डे , संदीप कासुर्डे , केळघर येथील मंडळाचे अध्यक्ष अभि जाभळे, सुनील जांभळे, सागर पार्टे , नांदगणे येथील मंडळाचे अध्यक्ष शांताराम बेलोशे , बापू दळवी , माजी सरपंच संजय दळवी , पांडुरंग दळवी , जगनाथ दळवी , सावली येथील सरपंच विजय सपकाळ , मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर , म्हाते येथील माजी सरपंच हणमंत शिंगटे , मोहाट येथील सरपंच विलास धनावडे , गांजे येथील सुनिल देशमुख , सरपंच विकास देशमुख , रामचंद्र देशमुख , कुसूंबी येथील सरपंच मारुती चिकणे , उपसरपंच निवृत्ती मोरे , अमोल सपकाळ ,मंडळाचे अध्यक्ष प्रतिक चिकणे , सौरभ चिकणे , मुकूंद वेंदे , किसन चिकणे , करंडी येथील सरपंच अंकुश शेलार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते , ग्रामस्थ , युवक उपस्थित होते .
या भेटीप्रसंगी तालुक्यातील प्रत्येक गाव , वाड्या वस्त्यांवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विकास काम पोहचले असून यावेळेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून भरभरून मतदान करून मताधिक्याने निवडुन देतील अशी ग्वाही कुसूंबीचे सरपंच मारुती चिकणे यांनी दिली .