राज्य परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा
-आगार व्यवस्थापक सौ. नीता बाबर
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मेढा आगार यांच्यावतीने प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक सौ नीता बाबर यांनी केले .
मेढा (ता जावली ) येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी असणाऱ्या विविध प्रवासी सेवेबद्दल तसेच विदयार्थी व विद्यार्थिनी यांना देण्यात येणाऱ्या सवलतीचे पास व इतर विविध योजना इत्यादी संदर्भात भेट दिली . यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी ,उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे ,वाहतूक निरीक्षक अजित मुघडे ,सागर तरडे आदि उपस्थित होते .
यावेळी सौ . निता बाबर यांनी विस्तृत माहिती दिली तसेच राज्य परिवहन महामंडळ मेढा आगार यांचे महाविद्यालय व महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य मिळत राहील याची ग्वाही दिली व राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांचा आवर्जून लाभ घ्यावा असे नमूद केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आखलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून घ्यावा यासाठी आवाहन करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविद्यालयात सदिच्छा भेट दिली. प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्यास अनुसरून मेढा आगार हे विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी नक्कीच उत्तम काम करीत आहे त्यामुळेच मेढा आगाराचे नाव महाराष्ट्र राज्यात अग्रक्रमाने घेतले जात आहे. त्यानी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वेळा प्रमाणे तसेच नवीन विविध मार्गांवर च्या बसेस सुरू करून उत्तम सहकार्य केले आहे. त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी आगार व्यवस्थापक सौ.नीता बाबर ,वाहतूक निरीक्षक अजित मुघडे व वाहतूक नियंत्रक सागर तरडे यांचे अभिनंदन केले .