गाढवली येथील प्रलंबित विकास कामे मार्गी लावणार - आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले ; अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

0

 


गाढवली पुनर्वसन - कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. समवेत ज्ञानदेव रांजणे, प्रविणमहाराज शेलार, प्रकाश शिंदे, बबनराव शिंदे, मानाजी माने, महादेव सपकाळ आदी.


गाढवली येथील प्रलंबित विकास कामे मार्गी लावणार - आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले ; अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

      गेल्या अकरा वर्षांपासून गाढवली पुनवर्सन येथील ग्रामस्थ अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा राबवित आहेत. यामुळे धार्मिक परंपरा वाढीस लागते आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली की गाढवली येथील प्रलंबित कामे मार्गी लावली जातील तसेच जावळीकरांचे स्वप्न असलेले बोंडारवाडी धरणाची प्रशासकीय मान्यता व निविदा प्रकिया विधानसभा निवडनिकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून हा प्रकल्प निश्चित मार्गी लावला जाईल, जावळी तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना मी दिलेला शब्द शंभर टक्के पाळतो त्यामुळे तालुक्यात विक्रमी विकासकामे मी मार्गी लावली असून तालुक्याने असेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

गाढवली पुनर्वसन येथे अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, हभप प्रवीण महाराज शेलार, गाढवलीचे सरपंच मानाजी माने, उपसरपंच महादेव सपकाळ, माजी सरपंच प्रकाश शिंदे, बबनराव शिंदे, रमेश शेलार ,धोंडिबा माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

                 आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पावसापूर्वी केळघर-कुरळोशी-गाढवली रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या आहेत. गाढवली ग्रामस्थ नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत त्यामुळे येथील जास्तीत जास्त विकासकामे आमदार निधीतून मार्गी लावली असून उर्वरित राहीलेले कामेही पूर्ण केली जातील. जावळी तालुक्यातील नागरिकासासाठी महत्वाचा असलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या धरणास प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया होण्यासाठी आचारसंहिता संपताच प्रयत्न करणार आहे. या धरणासाठी जागा देणाऱ्या स्थानिक शेतकरी,ग्रामस्थांचे योग्य प्रकारे पुनर्वसन होण्यासाठी काम करणार असून हे धरण झाल्यास जावळी तालुक्यातील ५४ गावांचा शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.त्यामुळे विकासकामे मार्गी लावणाऱ्या लोकप्रतीनिधीच्या मागे जावळीकरांचे प्रेम व आशीर्वाद मला नेहमी मिळतात.

या कार्यक्रमाला गाढवली व परिसरातील ग्रामस्थ,महिला, युवक उपस्थित होते.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)