आलेवाडी गावात महाश्रमदानातून ,पाणी आडवा, पाणी जिरवा , ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीचे सहकार्य

0

 


आलेवाडी - ज्ञानदीप क्रेडिट संस्थेच्यावतीने धनादेश देताना जिजाबा पवार, लक्ष्मण चव्हाण , संजय पवार, अनिल पवार, राजेंद्र भिलारे व ग्रामस्थ .


आलेवाडी गावात महाश्रमदानातून पाणी आडवा, पाणी जिरवा , ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीचे सहकार्य


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

 आलेवाडी ( ता . जावली ) येथे नाम फौंडेशनच्यावतीने चाललेल्या पाणी आडवा, पाणी जिरवा चळवळीसाठी ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीच्यावतीने एक लाख रुपयांचा धनादेश नुकताच दिला असून यामुळे या चळवळीला बळ मिळाले आहे .

       गेल्या काही दिवसापासून आलेवाडी गावच्या डोंगर शिवारात " नाम" फौंडेशनच्या सहकार्याने गेले 36 दिवस पाणी अडवा पाणी जिरवा हे काम डोंगर परिसरात चालू असून या कामाला जावली तालुक्यातून वाढता प्रतिसाद मिळत आहे . यासाठी महा श्रमदानातून चागल्या प्रकारे यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून महा श्रमदान आयोजित करण्यात आले होते . यावेळी सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ म्हणून ओळखली जाणारी ज्ञानदीप क्रेडिट सोसायटी आहे या संस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार यांनी आलेवाडी गावात चांगले काम चालले आहे याची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष श्रमदाना च्या ठिकाणी भेट देऊन श्रमदान मोहीमेत भाग घेतला व ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीच्यावतीने 1 लाख रुपयांचा धनादेश ग्रामस्थांना सुपूर्द केला .

     याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण चव्हाण यांच्यासह संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी जिजाबा पवार म्हणाले " नाम" फौंडेशनचे काम दुष्काळी भागात चांगले चालले आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल ही एक सामाजिक बांधिलकी असून ज्ञानदीप क्रेडिट संस्था अशाच चांगल्या समाज हिताच्या कामाला नेहमीच मदतीचा हात दिला आहे . आलेवाडी गावाने एकी च्या बळावर मोठे काम हाती घेतले आहे त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या . प्रास्ताविक संजय पवार यांनी केले . अनिल पवार यांनी कामाची विस्तृत माहिती दिली . तर यावेळी जिजाबा पवार, लक्ष्मण चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला . राजेंद्र भिलारे यांनी आभार मानले . यावेळी महाश्रमदानासाठी सोमनाथ काशिलकर, सुहास पाटील, विलासबाबा जवळ, रफिक शेख , संपतराव पवार, विजय पवार,मेढा, कुडाळ परिसरातील अनेक गावचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, आलेवाडी महिला, ग्रामस्थ उपस्थित होते .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)