केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
मौजे मुकवली ( ता . जावली ) येथे श्री. काळ भैरवनाथ व जोगेश्वरी माता प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गुरुवारी दि .२ व शुक्रवारी दि .३ सलग दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
प्राण प्रतिष्ठापना प्रभुदेव शिवाचार्य महाराज मठ संस्थान माढा व महादेव शिवाचार्य महाराज मठ संस्थान वाई यांच्या हस्ते होणार आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता मूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यानंतर ग्राम प्रदक्षिणा, महाप्रसाद कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवार दि .३ रोजी मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना ,आशीवर्चन ,महामंगल आरती होणार आहे.दुपारी एक वाजता मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर माहेर वासिनींना मानाची ओटी, हळदी-कुंकू कार्यक्रम होणार आहे.यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ मुकवली यांनी केले आहे.


