सातारा - जखमींना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात दाखल करताना ज्ञानदेव रांजणे सागर धनावडे व सहकारी
प्रचाराच्या रणधुमाळीत ज्ञानदेव रांजणे यांनी केली अपघातातील जखमीला मदत . घडवले माणुसकीचे दर्शन
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
बुधवार दि . २४ रोजी सायंकाळी मानकुंमरे पाँईट मेढा येथे महायुतीचीचे खा उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ महायुतीचीचा महामेळावा होता . सदराचा कार्यक्रम उरकून जिल्हा बँकेचे संचालक व समाजसेवक ज्ञानदेव रांजणे आंबेघर येथे घरी परत जात असताना. करंजे ( मेढा ) गावच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध मोटार सायकल वरून एक व्यक्ती पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसली . त्यांनी तात्काळ गाडी थांबवून पाहिले असता चोरांबे गावचे रहिवाशी , माजी आ सदाशिवभाऊ सपकाळ यांचे चुलत बंधू व पंचायत समितीचे कर्मचारी रवींद्र सपकाळ हे होते . यावेळी सागर धनावडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली . कोण - कोण रुग्णवाहिका , दवाखाना, नातेवाईकांना फोन लावत होते . यावेळी रविंद्र सपकाळ हे माजी आ सदाशिवभाऊ सपकाळ यांचे बंधू आहेत हे कळल्यावर कोणतेही राजकीय मतभेद न करता ज्ञानदेव रांजणे तात्काळ खाली उतरले . म्हणाले रुग्णवाहिका यायला उशीर होईल . जखमीला गाडीत घेत तात्काळ दवाखान्यात नेत वेळेत उपचार केल्याने त्यांच्यातील राजकारणा पेक्षा माणुसकीचे दर्शन घडले .
यावेळी सागर धनावडे , बापू शेलार, सुभाष शेलार , समीर शेलार, साई रांजणे व करंजे येथील काही युवकांनी रविंद्र सपकाळ यांना सागर धनावडे यांच्या गाडीत ठेवले आणि मेढ्यात दाखवायचा की काय कराव हा विचार सुरु होता . रांजणे साहेबांनी तात्काळ निर्णय घेतला पेशंटच्या डोक्याला मार लागलंय इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा थेट सातारा गाठायचा ठरला यशवंत हॉस्पिटल . अन् गाड्या वेगाने सातारकडे निघाल्या .
यावेळेत रांजणे साहेबांनी डॉक्टरांना फोन करुन जखमीची कल्पना दिली .तिथली तयारी करुन ठेवलेली आणि त्यांच्या घरी सांगण्यासाठी प्रवासातून चोरांबे गावचे सरपंच , ग्रामसेवक यांना फोन करू लागले .कोणी फोन उचलेना तेवढ्यात माजी आ.सदाशिव भाऊ सपकाळ यांना फोन लागला आणि मग त्यांच्या घरी कळविणेत आला तोपर्यंत जखमीला घेऊन हे सर्वजण भणंगच्या पुढे निम्म्या रस्त्यात पोहचले होते. मग काय जसं जस गावात अपघाताची माहिती पोहचली तसे लोक दवाखान्यात जमू लागले .
इकडे सागर धनावडे यांच्या गाडीत जखमीला घेत ज्ञानदेव रांजणे यांनी स्वतःची गाडी पुढे लावून जोर जोरात हॉर्न वाजवत , अत्यंत वेगाने गाडी चालवत रस्ता मोकळा करून देत, करंजे ( मेढा ) ते यशवंत हॉस्पिटल सातारा हे अंतर १४० च्या स्पीडने केवळ ११ मिनिटांत कापत जखमीला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलला आणले. त्यांच्या रुपाने भेटलेल्या या देवदूतामुळे एकाचे प्राण वाचले .
तेथे पोहचल्यावर डॉक्टर काय आणि कसे करायचे ते सांगत होते . मॅनेजमेंट विचारत होते . नातेवाईक कोण नाही मग कस काय ? यावेळी ज्ञानदेव रांजणे यांनी सांगितलं नातेवाईक पोहचतील थोड्या वेळात तोपर्यंत उपचार सुरु करा . पैशाची काळजी करू नका मी आहे . मग कोणतेही डिपॉझिट न घेता उपचार सुरु झाले.
तातडीच्या उपचाराची माहिती ज्ञानदेव रांजणे यांनी फोन वरून सदाभाऊ सपकाळ यांना दिली . त्यानंतर नातेवाईक आल्यानंतर ज्ञानदेव रांजणे व त्यांचे सहकारी घरी यायला निघाले . तरीही त्यांना पेशंटचे रिपोर्ट कसे येतायत याची काळजी सतावत होती . रात्री एक वाजता डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे काही नाही असे सांगितल्यावर ते निवांत झाले .
या अपघाताच्या अगोदर अर्ध्या तासापूर्वी झालेल्या मानकुंमरे पाँईटवरील सभेत ज्ञानदेव रांजणे यांच्यासह अन्य नेते मंडळींनी आपआपल्या भाषणात सदाभाऊ सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली होती .मात्र अर्ध्या तासानंतर सदाभाऊं सपकाळ यांचा भाऊ अडचणीत आहे म्हटल्यावर क्षणाचाही विचार न करता . कोणतेही राजकीय मतभेद न करता तात्काळ मदतीसाठी धावणारे रांजणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खरी शिकवण आहे . छत्रपतींचे वारसदार आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची . नुसती माणसं मोठी असून उपयोग नाही . ती मनानेही मोठी असली पाहिजेत हे ज्ञानदेव रांजणे साहेब यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे . राजकारणाच्याही पलिकडे जाऊन समाजकारण करणारा आपला माणूस .यातून अजून एक वाटत आपण सर्वांनी जर रस्ते अपघातातील व्यक्तीना योग्य वेळी योग्य ती मदत केली तर अपघातातील मृत्यूचे प्रमाण नक्की कमी होईल. असा विश्वास यावेळी सागर धनावडे यांनी व्यक्त केला .