छाया - संग्रहीत
मालचौडी येथे बिबट्या आणि त्याच्या दोन पिलांचा मुक्त संचार , ग्रामस्थ भयभीत
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
मालचौंडी ता.जावली आणि परिसरामध्ये बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा रात्रीच्या सुमारास गावातून मुक्त संचार होत असून गावातील आतापर्यंत तीन पाळीव कुत्र्यांवरती हल्ला केलेला आहे.त्यात तिन्ही पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडलेले आहेत तसेच बऱ्याच जनावरांच्या गोठ्यामधील जनावरांवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. बिबट्याच्या आणि पिल्लांच्या या मुक्त संचाराने गावकरी पूर्ण धास्तावले असून त्याच्या या दहशतीमुळे गावामध्ये व आजुबाजुच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ शेत , शिवारात जाण्यास धजावत नाहीत . बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा वन विभागाने काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून व पंचक्रोशितुन होत आहे.वारंवार तक्रार देऊनही वनविभाग याच्याकडे कानाडोळा केला जात आहे जात आहे .काही तरी अनुचीत प्रकार घडण्याच्या अगोदर वनविभागाने तत्परतेने लक्ष घालून बिबट्याला जेरबंद केले पाहिजे गरजेचे आहे.अशी मागणी जनतेतून होत आहे

