मी दिलेला शब्द पाळतो , म्हणून सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी - आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले

0

 


मेढा - वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आ शिवेंद्रसिंहराजे भोसले, शेजारी नरेंद्र पाटील , अनिल देसाई , वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे व इतर


मी दिलेला शब्द पाळतो , म्हणून सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी - आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जनतेला दिलेला शब्द पाळने हे लोकप्रतिनिधी चे खरे कर्तव्य असते ही शिकवण स्व. भाऊसाहेब महाराज यांनी मला दिली. त्यानुसार आमदार म्हणून काम करत असताना मी दिलेला शब्द शंभर टक्के पाळतो त्यामुळे दुर्गम व डोंगराळ जावळी तालुक्यातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी असून जनतेच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता जावळी तालुका विकासकामांच्या बाबतीत राज्यात आघाडीवर ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असून अशीच साथ जावळीकरांनी मला कायम द्यावी.असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ( ता.२९ )  जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे मित्र समूहाच्यावतीने मेढा येथील मानकुमरे पॉईंटवर नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे,प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे,अर्चना रांजणे, माजी सभापती अरुणा शिर्के, हणमंतराव पार्टे, पांडुरंग जवळ, कांतीभाई देशमुख , शिवाजीराव मर्ढेकर, श्रीहरी गोळे, विकास देशपांडे, मोहनराव कासुर्डे , रामभाऊ शेलार,गीता लोखंडे, कविता धनावडे ,जयदीप शिंदे,दत्ता पवार, समीर अत्तार, सागर धनावडे आदींची उपस्थिती होती.
    आमदार भोसले म्हणाले, माझ्यासाठी पक्ष,पक्षनिष्ठा जेवढी महत्वाची आहे, तेवढाच महत्वाचा माझा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही भूमिका मी कायम घेतली आहे. मी सातत्याने आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी होत आहे, या यशात जावळी तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांचा मोठा वाटा आहे. लोकसभेला पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम प्रामाणिकपणे करून मी भाजपच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जावळी तालुक्याच्या विकासासाठी मी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. शाश्वत विकासकामांच्या माध्यमातून मला जावळी  तालुक्याला  खूप पुढे न्यायचे आहे. जावळी तालुक्यात असलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटनातून मोठी रोजगार वृद्धी होणार असून त्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे युवकांचे पुणे-मुंबईकडे होणारे स्थलांतर थांबेल. महू -हातगेघर धरणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. प्रतापगड कारखाना पुन्हा नव्या जोमाने उभा राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पनात भरीव वाढ होणार आहे. मेढा -केळघर विभागांतील  ५४गावांसाठी महत्वाचा असलेला बोंडारवाडी धरण प्रकल्प देखिल  अंतिम टप्यात आला आहे. मेढा शहराच्या सुशोभीकरणासाठी भरीव  निधी उपलब्ध करून दिला असून  देशाच्या प्रगतीसाठी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाला साथ द्यावी. देशहितासाठी काम करणाऱ्या मोदींवर पुन्हा एकदा विश्वास दाखवून देश महासत्ता करण्यात आपले योगदान मतदारांनी द्यावे. जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केले असून सुशासन व भ्रष्ठाचार  मुक्त कारभारासाठी भाजपला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले. 


      माजी आमदार नरेंद्र पाटील म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून जावळीकराना अष्टपैलू नेतृत्व मिळाले आहे. सहजपणे उपलब्ध होणारे व कायम लोकांच्या गराड्यात राहून लोकांचे प्रश्न  सोडविण्यासाठी तत्पर असणारे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांची ओळख आहे. माथाडी कामगारांचे ,युवकांचे प्रश्नही त्यांनी सोडवले आहेत. ज्ञानदेव रांजणे म्हणाले, जावळी तालुक्यात डोंगरकपारीतील गावांना जोडणारे पक्के रस्ते आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले असून तालुक्यात पर्यटनावर आधारित रोजगार वाढावेत म्हणून त्यांनी शासनाकडून करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. वसंतराव मानकुमरे म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला प्रतापगड साखर कारखाना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे पुन्हा नव्या दमाने सुरू झाला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यात आमदार म्हणून सर्वाधिक विकासकामे मार्गी लावली आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवसानिमित्त ज्ञानदेव रांजणे मित्रसमूह व  जावळी तालुक्याच्यावतीने  सत्कार करण्यात आला.यावेळी युवक ,महिला ,शेतकरी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.जयदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सागर धनावडे यांनी आभार मानले .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)