प्रधानमंत्री घरकुल योजनेत जावळी पंचायत समितीचा पुणे विभागात प्रथम क्रमांक

0

 


पुणे : प्रधानमंत्री घरकुल योजनेत विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल मनोज भोसले यांचा सन्मान करताना चंद्रकांत पुलकुंड वार ,याशनी नागराजन आदी


प्रधानमंत्री घरकुल योजनेत जावळी पंचायत समितीचा पुणे विभागात प्रथम क्रमांक




केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -  प्रधानमंत्री घरकुल योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे जावळी पंचायत समितीचा पुणे विभागात प्रथम क्रमांक आला असून आज पुणे येथील विधानभवन येथे जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचा सन्मान करण्यात आला. आज पुणे येथील विधानभवनात ग्राम विकास व पंचायत राज विभाग आणि पाणी पुरवठा व स्वछता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पंचायत राज अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व प्रधान मंत्री घरकुल योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींचा सत्कार करण्यात आला. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार ,सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये पुणे विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जावळी पंचायत समितीला प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जावळी पंचायत समितीच्या या यशाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे चांगल्या कामाचे चिज झाले असून शासनाच्या विविध योजनांमध्ये जावळी तालुका अग्रेसर होण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी व सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी  दिव्यदृष्टी नामा न्यूजशी बोलताना सांगितले .



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)