शेतकऱ्यांनी तृणधान्य व भरडधान्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेत त्याचा दैनंदिन आहारामध्ये वापर करावा - डॉ विमल भट

0

 



आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमात डॉ . विमल भट,डॉ . दिपिका पंडीता यांचे स्वागत करताना राघव बिरामणे 


शेतकऱ्यांनी तृणधान्य व भरडधान्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेत त्याचा दैनंदिन आहारामध्ये वापर करावा - डॉ विमल भट


आसनी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ , जागरुकता कार्यक्रम


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - शेतीवर होणारा अवाजवी खर्च टाळून सेंद्रीय पद्धतीने तसेच समूह शेती करुन तृणधान्य व भरडधान्यांचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे . तसेच दैनदिन आहारात त्याचा वापर करावा . असे आवाहन सिंबायोसिस इंस्टिट्यूटचे प्रकल्प संचालक डॉ . विमल भट यांनी केले .

      वेण्णा व्हॅली प्रोड्युसर कंपनी आसनी ( ता जावली ) येथे भारतीय सामाजिक विज्ञान परिषद नवी दिल्ली आणि सिंबोयोसिस इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ , जागरुकता आणि आशा पल्लविणे या कार्यक्रम प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते . यावेळी प्रभारी तालुका कृषिअधिकारी तेजदिप ढगे , वेण्णा व्हॅली प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष राघव बिरामणे , उपाध्यक्ष जगन्नाथ जाधव , माजी सरपंच बबनराव बेलोशे, सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ . दिपिका पंडीता , अनामा फातमा , हिमानी चौधरी , संशोधन सहाय्यक फातिमा हपिवाल आदिंची प्रमुख उपस्थिती होती .



   यावेळी तेजदिप ढगे म्हणाले , शेतकऱ्यांनी तृणधान्य व भरडधान्यांच्या उत्पादन वाढीव भर देत बचत गटांच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करून हे पदार्थ बाजारपेठेत विक्री करावी यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल . यावेळी सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ . दिपिका पंडीता म्हणाल्या, मिलेटस् शतकां पासून आपल्या अन्नाचा एक अभिन्न भाग आहेत . त्यासाठी आम्ही संस्थेच्यावतीने महाराष्ट्र , राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये तृणधान्य व भरडधान्य सेंद्रीय पद्धतीने पिकवून त्याचा जास्तीत जास्त आहारामध्ये समावेश व्हावा यासाठी शेतकऱ्यां मध्ये जागरुकता करत आहोत . यावेळी वेण्णा व्हॅली प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष राघव बिरामणे म्हणाले , तृणधान्य पिके म्हणजे नाचणी , वरी, राळ याचे उत्पादन कमी होऊ लागले आहे . त्यातून जीवनसत्वे मिळत असतात . त्यामुळे यापिकांचे सुधारित वाणांनुसार शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे . यावेळी सिंबोयोसिस इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणेचे डायरेक्टर डॉ श्रीरंग अलटेकर यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे मार्गदर्शन केले .

    यावेळी कृषि पर्यवेक्षक पी एल फडतरे , अजय पवार, कृषि सहाय्यक अनिल चव्हाण , नितिन जांभळे, वैभव डोईफोडे, सचिन नेवसे, वेण्णा व्हॅली प्रोड्युसर कंपनीचे संचालक, सभासद, परिसरातील शेतकरी उपस्थित होते . स्वागत जगन्नाथ जाधव यांनी केले तर आभार सचिव सुनिल गोळे यांनी मानले .




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)