"आय लव्ह जवळवाडी" सेल्फी पॉईंटचे सरपंच सुरेखा मर्ढेकर यांच्या हस्ते उदघाटन

0

 आय लव जवळवाडी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करताना सरपंच सुरेखा मर्ढेकर, गीता ताई लोखंडे,शंकर जवळ आदि


 "आय लव्ह जवळवाडी" सेल्फी पॉईंटचे सरपंच सुरेखा मर्ढेकर यांच्या हस्ते उदघाटन


 मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )


 जावळी तालुक्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळवाडी गावात सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. तालुक्यातील हा पहिलाच सेल्फी पॉइंट असून या सेल्फी पॉइंट चे उद्घाटन गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. सुरेखा मर्ढेकर यांच्या हस्ते करण्यात आले.     


        जवळवाडी ग्रामपंचायतीने गावची विकासात्मक वाटचाल करीत असताना विविध सामाजिक, शैक्षणिक, उपक्रम राबवले असून गावच्या वैभवात भर टाकणारा "आय लव जवळवाडी" हा सेल्फी पॉईंट गावच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारला आहे. हा सेल्फी पॉईंट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिमेंट रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन देखील सरपंच सौ. सुरेखा मर्ढेकर यांच्या हस्ते पार पडले.     


         यावेळी ग्रामपंचायत सदस्या गीताताई लोखंडे, उपसरपंच शंकर जवळ ,अण्णासाहेब धनावडे आंनदा जवळ, शंकर मर्ढेकर अशोक जवळ माजी सरपंच गणपत जवळ अनिल चव्हाण,पांडुरंग उर्फ बापू जवळ ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)