जन-जाती आदिवासी न्याय महाअभियानात मार्गदर्शन करताना आ. शिवेंद्रराजे भोसले सोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ज्ञानेश्वर खिलारी, धैर्यशील कदम व इतर.
पी एम जनमन योजनेतर्गंत आदिवासी व कातकरी समाजाला योजनेचा लाभ मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा - आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
आपल्याकडे असणारा कातकरी समाज दुर्लक्षित असून त्यांना खऱ्या अथनि न्याय मिळाला पाहिजे, त्यांना प्रवाहाबरोबर घेतले पाहिजे. पी एम जनमन योजनेंतर्गत आदिवासी व कातकरी समाजाला योजनेचा लाभ मिळणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
मेढा, ता. जावली येथील कलश मंगल कार्यालयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑनलाईन संवाद कार्यक्रम व प्रधानमंत्री जन-जाती आदिवासी न्याय महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक संतोष हराळे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, वसंतराव मानकुमरे, सौरभ शिंदे, तहसिलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले आदी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, कातकरी समाजातील लाभार्थी कुटूंबांना तात्काळ घरे दिली जाणार आहेत. ज्यांची मुळ घरे आहेत ती दुरुस्त करून तिथे घरे बांधली जाणार आहेत. ज्यांना जागा नाही त्यांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी कातकरी समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे. स्वच्छता व शिक्षण या सर्व गोष्टींसाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करु, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, प्रधानमंत्री जन-जाती आदिवासी न्याय महाअभियान ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असून याअंतर्गत जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ११ विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांपासून कातकरी समाजातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही.कातकरी समाजातील मुला- मुलींना कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना विविध उद्योगांत रोजगार उपलब्ध केला जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले , जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जन मन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत . हे महाअभियान जिल्ह्यातील ७१ गावांमध्ये राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे .
भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, पी एम जनधन योजनेंतर्गत आत्तापर्यंत ९० लाख लोकांना घरे बांधून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना कामे देण्यासाठी कौशल्य विकास योजना आणली असून आयुष्मान भारत योजनेतून ५ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
दरम्यान, कातकरी समाजासाठी यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .