जलजीवन मिशन योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी मेढ्यात वकृत्व स्पर्धा

0

 


मेढा - वक्तृत्व स्पर्धे प्रसंगी आनंद साठे , प्रा. श्रीमती जाधव , दीक्षा खामकर व इतर

जलजीवन मिशन योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी मेढ्यात वकृत्व स्पर्धा


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद सातारा यांच्यातर्फे आयोजित जल जीवन मिशन योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा नुकत्याच श्री.वेण्णा विद्यामंदिर व ज्युनि कॉलेज मेढा येथे पार पडल्या. या स्पर्धेतील महाविद्यालयीन गटात वैभवी भरत सुर्वे बी. एस्सी भाग १ हिने प्रथम क्रमांक पटकावला तर ज्युनिअर कॉलेज गटात प्रांजल संतोष बेलोशे हिने प्रथम क्रमांक मिळविला . 

     या स्पर्धेमध्ये ज्युनिअर कॉलेज गटामध्ये प्रथम क्रमांक - आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या प्रांजल संतोष बेलोशे ,द्वितीय क्रमांक -श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या आदिती प्रकाश धनावडे , तृतीय क्रमांक - प्रगती मानसिंग बांदल ( श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा) यांचा आला. तर महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक - वैभवी भरत सुर्वे बी. एस्सी भाग १ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा ,द्वितीय क्रमांक आदिती यशवंत बेलोशे बी. कॉम भाग ३ आणि तृतीय क्रमांक संचीता विलास शिंदे बी. ए.भाग ३ यांचा आला. यशस्वी विद्यार्थांची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.         

   या स्पधैमध्ये आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा , महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुडाळ, दीपक पवार कॉलेज ऑफ सायन्स कुडाळ, श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा येथील विद्यार्थीनी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी पंचायत समिती मेढा, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी श्री कर्णे , विद्यालयाचे प्राचार्य पाटील बी.बी यांनी मार्गदर्शन केले .यावेळी केंद्रप्रमुख श्री देशमुख पंचायत सामितीच्या स्वच्छ भारत मिशन विभागाचे संतोष जाधव, रमेश शिंदे , ज्येष्ठ शिक्षिका सौ. वायदंडे उपस्थित होते.

     यास्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. आनंद साठे सर , प्रा. श्रीमती जाधव मॅडम आणि प्रा. कु. दीक्षा खामकर मॅडम यांनी काम पाहिले . स्पर्धां यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बी.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका गारूळे मॅडम व प्रा. संतोष कदम , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)