फोटो - आलेवाडी - यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अधिकारी , शिक्षक
केळघर : वार्ताहर -
जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिळ शाळा, आलेवाडी येथील विद्यार्थ्यांनी सातारा येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांत चमकदार कामगिरी केली.
सातारा पोलिस परेड ग्राउंडवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जावळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आलेवाडी शाळेने चमकदार कामगिरी करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या स्पर्धांत वेदांत बिरामणे लहान गट १०० मी. धावणेत प्रथम, मोठ्या गटात सोहम वारागडे ६०० मी. धावणेत प्रथम, सिद्धांत भोसले ८०० मी. धावणेत प्रथम व सोनाली पवार ६० मी धावणेत द्वितीय असे चमकदार यश मिळवत शाळेची मान उंचावली.
विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती जागृत करत नितीन जाधव, आप्पासाहेब निकम, समरसिंग शिंदे व प्रियांका किरवे तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ फौजी निलेश पवार यांचे खेळाडूंना प्रेरक मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,भाग विस्ताराधिकारी कल्पना तोडरमल मॕडम, भाग विस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, सरपंच मंगेश पवार, अध्यक्ष व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती,आलेवाडी यांनी अभिनंदन केले.

