ओखवडी सरपंचपदी कौसल्या शेलार तर उपसरपंचपदी हरिभाऊ पार्टे यांची बिनविरोध निवड
केळघर : वार्ताहर - ओखवडी ( ता . जावली ) ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामस्थांच्या एकीमुळे बिनविरोध झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ओखवडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. यावेळी बिनविरोध झालेल्या सरपंचपदी कौसल्या लक्ष्मण शेलार यांची तर उपसरपंचपदी हरिभाऊ पांडुरंग पार्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदस्यपदी संपत शेलार, भगवान आखाडे ,मंगल शेलार, लिलाबाई शेलार,सुनीता सुतार, दीपाली शिंदे यांची निवड झाली आहे.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.