मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे -पाटील यांची मेढ्यात शनिवारी विराट सभा , गावा -गावात नियोजनाचा धडाका

0

 


केळघर येथील भैरवनाथ मंदिरात नियोजनासाठी जमलेले सकल मराठा समाज बांधव

मराठा आरक्षणासाठी  मनोज जरांगे -पाटील यांची मेढ्यात शनिवारी विराट सभा , गावा -गावात नियोजनाचा धडाका

मेढा : प्रतिनिधी ( टिम दिव्यदृष्टी नामा ) -
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे - पाटील यांची मेढा या तालुक्याच्या राजधानीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सभा होत असून या सभेच्या जय्यत तयारीसाठी तालुक्याच्या विविध भागात , गावा -गावांमध्ये बैठकांचा धडाका चालू झाला आहे.
    येत्या शनिवारी दि .१८नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मराठा समाजाची ऐतिहासिक विराट सभा आयोजित केली असुन, सभेच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहे.या सभेसाठी  मराठा बांधव मेढा शहरात येणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सभा मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार असून मेढा महाबळेश्वर रस्त्यावरील सातारहून येणारी वाहतुक व्यवस्था वेण्णानगर मार्गे सावली पुलावरून महाबळेश्वरकडे असा सभा काळात बदल करण्यात येणार आहे. मनोज जरांगे -पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी सातारा, जावली, महाबळेश्वर तालूक्यातील मराठा बांधव मोठया प्रमाणात हजर राहणार असल्याने सर्वच प्रमुख रस्त्यावर देखील मोठी वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर मेढा पाचवड रस्ता, मेढा मुख्य बाजार चौक रस्ता, मेढा ते साताराकडे जाणारा रस्त्यावर मराठा समाज बांधवाची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.


   याबाबत मेढा पोलीस स्टेशनला निवेदन देणेत आले असून कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी तसेच येणाऱ्या मराठा समाजातील बांधवाना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात यावी याकरिता विनंती करणेत आली आहे.या सभेसाठी तालुक्यातील विभागवार,गावा -गावात नियोजन करण्यात येत असून प्रत्येक गावांतील पुरुष - महिला यांनी एक दिवस शेतातील काम बंद ठेवून मुलांबाळांसह समाजासाठी एक दिवस द्या , असे ठरविण्यात आले आहे . तर पुणे , मुंबईस्थित जावलीकरही बैठका घेत आहेत . तालुक्यातील  सर्व मराठा समाज बांधव भगिनी,यांनी आपल्या मुलांबाळासह तालुक्याच्या ठिकाणी हजर रहावे असे आवाहन जावली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करणेत आले आहे.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)