केळघर : वार्ताहर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जावली तालुका, मेढा शहर श्री.आत्मीय स्वयंसेवक बंधू, विजयादशमी आणि सीमोल्लंघन म्हणजे विजिगिषु हिंदू समाजाच्या प्रगतीची आणि शौर्याची पाऊले, चिरविजयी सामर्थ्याच्या बळावर मातृभूमीला परम वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प करण्याचा दिवस! महिषासुराला मारणारी, रावण, कंस आणि राक्षसी वृतीचे निर्दालन करणारी शक्ती आपण आपल्या संघटनेच्या सामर्थ्यातून आणि वैयक्तिक चारित्र्यातून निर्माण करू असा संकल्प करण्याचा हा दिवस...!
निराशा, निष्क्रीयतेच्या अंध:कारातून प्रकाशाकडे जावून सीमाल्लंघन करण्याचा दिवस...! त्यानिमित्त मेढा (ता. जावली ) येथील सिद्धगणेश मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन व शस्त्रपूजन या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २८/१०/२०२३,रोजी दुपारी ३.३० मि ५.३० पर्यत करण्यात आले आहे .
यावेळी प्रमुख पाहुणे ह. भ. प. आप्पासाहेब निकम तर प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सेवा प्रमुख नितिन पोरे हे मार्गदर्शन करणार आहेत .
वरील मान्यवराच्या उपस्थितीत पथ संचलन व विजयादशमी उत्सव साजरा होत आहे. तरी आपण आपल्या कुटुंबासह या उत्सवासाठी उपस्थित रहावे . असे आवाहन जावली तालुका कार्यवाह अविनाश कारंजकर ,सहकार्यवाह चंद्रशेखर क्षिरसागर यांनी केले आहे .