मराठा आरक्षण समर्थनात सोमवारी जावळी तालुक्यातील मराठा समाजाची मेढा येथे मोटारसायकल रॅली.

0

 


केळघर : वार्ताहर -  जावली तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना कळविण्यात येते की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सध्या मनोज जरांगे पाटिल यांच्या आमरण उपोषणाच्या नवीन भूमिके नंतर महाराष्ट्रभर विविध पडसाद व पाठिंबा पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, समर्थनात साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्ता रोको, मोटरसायकल रॅली त्याचबरोबर विविध शासन स्तरावर निवेदन सुरू देणे सुरू आहे.

    जावळी तालुक्यात आजवर मराठा आरक्षणासाठी झालेल्या सर्वच उपक्रमात सर्व मराठा बांधवांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे. आता गरज आहे की हा मराठा आरक्षणाचा सगळ्यात  मोठा एल्गार  सुरू आहे त्याला पुन्हा एकदा जावळीतून बळ देण्याची. जेणेकरून आरक्षणाचा हा लढा पूर्णपणे यशस्वी होऊन आरक्षण मिळेल. यासाठी मराठा समन्वयक व  तालुक्यातील विविध लोकांच्या झालेल्या चर्चेनुसार सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भैरवनाथ मंदिर मेढा आवारामध्ये आपण सर्वजण एकत्र येत आहोत . त्या ठिकाणी आपली मीटिंग होऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. त्याच सोबत आलेल्या सर्व बांधवांची प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोटरसायकल रॅली होईल.

 या मिटींग साठी व रॅलीमध्ये सर्व युवक, महिला माता-भगिनी तसेच जेष्ठ मराठा बांधवांनी सहभागी व्हायचे आहे. अशा पद्धतीची प्रसिद्धी  संपूर्ण तालुकाभर करायची आहे. त्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करू .

       दरम्यानच्या काळा मध्ये सोमवार पर्यंत कुडाळ, मेढा,वेण्णा दक्षिण, केळघर,बामणोली व सायगाव विभागातील सर्व मराठा बांधवांनी आपापल्या विभागात मीटिंग घेऊन त्यांना सोमवारच्या या मोटरसायकल रॅली व मीटिंग संदर्भात माहिती द्यावी आणि आपल्या भागात जागृती करावी . असे आवाहन जावळी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)