संजीवनी ट्रस्टच्यावतीने श्री भैरवनाथ विद्यालयासह बाहुळे, वरोशी येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप .

0

 


फोटो - केळघर - विद्यार्थ्यांना साहित्य वाटप प्रसंगी सुज्ञ बोकील, दिपा बापट, बिनॉय थॉमस, संगीता चौधरी , सुरेश चिकणे,संपत बैलकर,संतोष चिकणे, जगदाळे एस.जे. , शिंदे एस.बी.

केळघर : वार्ताहर - संजीवनी आदिवासी ग्रुप डोंबिवली यांच्यामार्फत श्री भैरवनाथ विद्यामंदिर केळघर मधील सत्तावीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संजीवनी ट्रस्ट कडून दरवर्षी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते.

     यावेळी ट्रस्टी सुज्ञ बोकील, दिपा बापट, बिनॉय थॉमस, संगीता चौधरी व सुरेश चिकणे,संपत बैलकर,संतोष चिकणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे एस.जे. ज्येष्ठ शिक्षक शिंदे एस.बी.यांच्या हस्ते ज्यांना आई किंवा वडील नाहीत.अशा 27 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

          संजीवनी आदिवासी ग्रुप डोंबिवली यांच्यामार्फत दरवर्षी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शालेय उपयोगी साहित्याची वाटप करण्यात आले श्री भैरवनाथ विद्यामंदिर केळघर येथील ज्यांना आई किंवा वडील नाही अशा 27 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे एस जे यांनी संजीवनी आदिवासी यांचे आभार मानले.

     दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुळे व वरोशी येथील विद्यार्थ्यांनाही संजीवनी आदिवासी ग्रुपच्यावतीने शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)