मेढा -जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दिनाच्या शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ विक्रम अंबादास आव्हाड व इतर
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कायदे विषयक शिबिर संपन्न. प्रत्येकाच्या वाढदिवसा निमित्त एक झाड लावून जागतिक वसुंधरा दिन साजरा करूयात - न्या डॉ विक्रम अंबादास आव्हाड
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - मा. ना. सर्वोच्च न्यायालय , उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार दिवाणी व फौजदारी न्यायालय, मेढा येथे डॉ विक्रम अंबादास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व जावली तालुका विधी सेवा समिती, वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर एस पोफळे, उपाध्यक्ष व्ही बी विधाते, एम.एस माने, श्रीमती ए के शेटे , श्री. शिर्के ,
श्रीमती.व्हि.व्हि.गाढवे,श्रीमती ए आर पवार, श्री निवास कणसे सहा सरकारी वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थीत होते.
सदर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात प्रारंभी जावली तालुका वकील संघाच्या सदस्य श्रीमती ए के शेटे यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त निसर्गाची होणारी हानी, लोकसंख्येमुळे वसुंधरेवर होणारा परिणाम व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले. श्री निवास कणसे सहा सरकारी वकील यांनी प्लास्टिकमुळे वसुंधरेचे होणारे नुकसान तसेच प्लास्टिक किती घातक आहे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले. जावली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डॉ विक्रम अंबादास आव्हाड यांनी आपल्या भाषणात प्लास्टिकचा भस्मासुर त्यामुळे होणारे मानव जातीचे नुकसान तसेच सर्वात घातक कचरा म्हणजे आपले मोबाईल, लॅपटॉप, संगणक, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे वेळीच आटोक्यात नाही आणले तर आपले जगणे मुश्किल होवू शकते. तसेच जुन्या मोबाईल मधील मदर बोर्डचा कोणीही गैर वापर करून फायदा घेऊ शकते. त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. आज काल प्रत्येकाला सावली हवी आहे, स्वच्छ हवा हवी आहे पण झाडे कोणी तितक्या तत्परतेने लावत नाहीत. आजकाल आपण जे वाढ दिवस साजरे करतो त्या वाढ दिवसानिमित्त प्रत्येकाने एक झाड लावून जगवले पाहिजे. आपल्या प्रत्येक सणानिमित्त किंवा आपल्या घरात होणाऱ्या आनंदात प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, जगवले पाहिजे, वाढवले पाहिजे तरच आपण जगू शकतो नाहीतर भविष्यात प्रत्येकाला शुद्ध हवाही विकत घ्यावी लागेल, वेळीच सावध होऊन आपल्या वसुंधरेला सुजलाम केले पाहिजे. हे विश्वाची माझे घर मानून प्रत्येकाने तसे वागले पाहिजे.
सदरील कार्यक्रमाचे आभार जावली तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष व्ही बी विधाते यांनी केले. त्यावेळी त्यांनी प्रत्येकाने प्लास्टिक मुक्त वसुंधरा करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली पाहिजे. त्या वेळी त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले ते जेंव्हा बाजारात खरेदीला जातात . त्यावेळी ते स्वतः कापडी पिशवीचा वापर करतात . त्यांच्या या उपक्रमाचा सर्वांनी कौतुक केले . उपस्थीत मान्यवर व पक्षकारांचे आभार मानले.

