69 वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा दिल्लीत संपन्न; महाराष्ट्र संघाला कास्यपदक जवळवाडी (जावली ) येथील सचित मर्ढेकर याची मुंबई विभागातून महाराष्ट्र संघात निवड

0

 

दिल्ली - महाराष्ट्राचा बेलबॉल संघ  सोबत सचित मर्ढेकर

69 वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा दिल्लीत संपन्न; महाराष्ट्र संघाला कास्यपदक

जवळवाडी (जावली ) येथील सचित मर्ढेकर याची मुंबई विभागातून महाराष्ट्र संघात निवड

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - 69 वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे पार पडली .या स्पर्धेमध्ये बालमोहन विद्यामंदिर दादर येथील विद्यार्थी सचित शंकर मर्ढेकर याची मुंबई विभागातून महाराष्ट्र संघात निवड झाली होती.

      या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने उत्तुंग कामगिरी करत आसाम राज्याला 9/0 हरियाणा 6/0 राजस्थान 5/0 तसेच तामिळनाडू 7/0 असे सलग चार विजय संपादन करत उपात्य फेरीत धडक मारली.

उपांत्य फेरीत खेळताना दिल्ली संघाने महाराष्ट्राला 2/0 ने हरवून फायनल मध्ये प्रवेश केला.



महाराष्ट्र संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या संघात जावली तालुक्यातील जवळवाडी गावचा सुपूत्र व दादर (मुंबई ) येथील बाल मोहन विद्यालयाचा विद्यार्थी सचित शंकर मर्ढेकर यांने दमदार अशी कामगिरी केली . त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई गिरी तसेच जवळवाडीच्या सरपंच सुरेखा सतीश मर्ढेकर,सावित्री सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शंकरराव मर्ढेकर वेन्नामाई पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पार्टे , प्रा प्रकाश जवळ  तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सचित व महाराष्ट्र संघाचे अभिनंदन केले .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)