पेन्शनधारकांना मार्गदर्शन करताना सुभाष पोखरकर व मान्यवर
इ पी एस 95 पेन्शन धारकांचे यश अंतिम टप्प्यात - सुभाष पोखरकर
९ मार्चला दिल्लीतील जंतर मंतर वर आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
केळघर : प्रतिनिधी - (टीम दिव्यदृष्टी नामा न्यूज) -
ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा संघर्ष आणि लढा गेली दहा वर्ष सुरू असून केंद्रीय मंत्री स्तरावर ही पेन्शन लागू करण्यासाठी अनेक बैठका झाल्या मात्र आता आपला लढा अंतिम टप्प्यात आला असून लवकरच पेन्शन धारकांना किमान पेन्शन साडेसात हजार व महागाई भत्ता आणि पेन्शनधारक पती-पत्नींना मोफत आरोग्यसेवा मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही लढ्याला यश येण्यासाठी नऊ ते अकरा मार्च रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील लाखो पेन्शनधारक उपस्थित राहणार असून सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पेन्शन धारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी सांगितले
मेढा येथे पेन्शन धारकांच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून पोखरकर बोलत होते यावेळी महाराष्ट्र प्रांतीय संघटक अजितकुमार घाडगे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत,पुणे जिल्हा. संघटक दिलीपराव कहाणे,पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष तानाजी आण्णा काळभोर, संगमनेर सचिव सुरेश कटारिया,सातारा जिल्हाध्यक्ष भुजंगराव जाधव,उपाध्यक्ष हणुमंत फाळके,सचिव जगन्नाथ मोहिते, जावली तालुकाध्यक्ष बापूराव जगताप संघटक किसन जवळ एकनाथ गाढवे, जयवंत मोरे तुकाराम जुनघरे आनंदराव जुनघरे आदी मान्यवर उपस्थित होते
पोखरकर पुढे म्हणाले देशातील आणि राज्यातील अनेक पेन्शन धारकांच्या मनात शंका निर्माण होत आहे की काही होतंय का नाही परंतु असं काही नाही EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा लढा अंतिम टप्प्यात आला असून लवकरच आपल्या लढ्याला यश येणार आहे पेन्शन धारकांना कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता तसेच पती-पत्नींना मोफत आरोग्य सेवा पतीच्या निधनानंतर पत्नीला पूर्ण पेन्शन आधी मागण्या मान्य होण्याच्या मार्गावर आहेत यासाठी 9 ते 11 मार्च दिल्लीतील जंतर-मंतरवर देशातील लाखो पेन्शनर्स आंदोलन करणार असून सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शनर्सनी या आंदोलनासाठी उपस्थित राहावे
यावेळी तानाजी काळभोर,इंद्रसिंग रजपूत,अजितकुमार घाडगे आदींची भाषणे झाली प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बापूराव जगताप यांनी केले घेतले.एकनाथ गाढवे यांनी आभार व्यक्त केले.,
मेळाव्याला सातारा तालुकाध्यक्ष एकनाथ साळुंखे,सुमनबाई उतेकर (महाबळेश्वर), रंजना जाधव, चंद्रमनी ढापरे(कराड), बाळकृष्ण यादव (सासपडे), सुरेश ताटे, वसंत साळुंखे, शंकर निकम मोहनराव कासुर्डे,चंद्रकांत ओंबळे, बाळकृष्ण देशमुख,एकनाथ चौधरी, चिंतामणी ढापरे यांचेसह जावळी व शेजारील तालुक्यातील ईपीएस पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते . मेळावा यशस्वीतेसाठी बापूराव जगताप, किसनराव जवळ, एकनाथ चौधरी,जयवंत मोरे, तुकाराम जुनघरे, मोहनराव कासुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.

