विकास कामांच्या जोरावर भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार - ना शिवेंद्रसिंहराजे भोसले
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज जिल्हा परिषद कुसुंबी गटातून सौ. अर्चना रांजणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मेढा येथे तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री मोरे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आ सदाशिव सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्यावतीने सौ .अर्चना रांजणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले, जावळी तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी महत्वाचे असलेले बोंडारवाडी धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. जावळी तालुक्यातील विकासकामे केवळ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच करू शकतात.त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येणार यात कोणतीच शंका नाही



