ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त सावली येथे महाआरोग्य शिबीर

0

 


ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त सावली येथे महाआरोग्य शिबीर


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )- 

लोकनेते ज्ञानदेव रांजणे साहेबांच्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे निमित्ताने उद्या बुधवारी १८ रोजी सकाळी ९ वाजता महाआरोग्य शिबीर सावलीत होणार असून वाढदिवसापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे .

*श्री .छ .नामदार महाराजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते व DCC बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या महाआरोग्य शिबीराचे आयोजन सावली गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा जनआरोग्य समितीचे अध्यक्ष विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून या महाआरोग्य शिबाराचे आयोजन सावली येथे करण्यात आले आहे*        

*आपल्या सावली व पंचक्रोशीतील गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की उद्या बुधवारी दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता आपल्या गावामध्ये पिरामल फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र गवडी यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे तरी यामध्ये शुगर बीपी ची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार तसेच मोफत गोळ्या वाटप होणार आहे त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित राहून विविध आजाराच्या तपासण्या व त्यावरील औषध उपचार मोफत करण्यात येणार आहे तरी याचा लाभ गावातील व भागातील रुग्णांनी घ्यावा ही विनंती . त्याचबरोबर सरकारी दवाखान्यातून जे रुग्ण शुगर बीपीच्या गोळ्या केळघर व मेढा येथून घेऊन येतात त्यांना या गोळ्या आपल्या सावली गावांमध्येच या शिबिराच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे . तरी याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा ही नम्र विनंती

   सरपंच विजय बाबाजी सपकाळ, उपसरपंच बाबुराव भिलारे, सदस्य आनंदा जुनघरे, सुरेश कांबळे, सदस्या आनंदी प्रकाश जुनघरे, वनिता संदीप म्हस्कर, रूपाली विजय जुनघरे, निर्मला नथुराम जुनघरे

ग्रामपंचायत अधिकारी दिलीप राक्षे, मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, उपाध्यक्ष सुशांत जुनघरे, ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र जुनघरे, आशा स्वयंसेविका शैला पांडूरंग म्हस्कर यांनी केले आहे 

  यासाठी ग्रामस्थ मंडळ विशेष प्रयत्न करीत आहेत .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)