जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व तालुका विधी सेवा समिती, मेढा यांचेवतीने विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा मेढा येथे महामेळावा

0

 


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व तालुका विधी सेवा समिती, मेढा यांचेवतीने विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा मेढा येथे महामेळावा


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )-

         जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व तालुका विधी सेवा समिती, मेढा यांचेवतीने विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा रविवार दि १५ डिसेंबर २०२४ रोजी साडे दहा वाजता लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय मेढा पाचवड रोड, मेढा ता. जावली येथे आयोजीत केला असल्याची माहिती संयोजकांनी दिली.


       एकाच ठिकाणी सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळविण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना शेती अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आरोग्य विषयक डोळयांची तपासणी -, रक्त तपासणी ,दंत तपासणी केली जाणार आहे. रेशनकार्ड, आधार कार्ड याचे अदयावतीकरण करून दिले जाणार आहे. वरील योजनांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत लोकन्यायालय व मधस्थी प्रक्रियेबात माहिती दिली जाणार आहे. 


        या मेळाव्यात कृषी, उद्योग, वीज, आरोग्य, प्रशासन, वन विभाग, पोलीस विभाग, अशा सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देण्यात येणार असून सर्व विभागाचा सहभाग या महा मेळाव्यामध्ये असणार आहे. नागरिकांनी रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी साडे दहा वाजता लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय मेढा पाचवड रोड, मेढा, ता. जावली, जि. सातारा येथे उपस्थित राहून शासनांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)