मेढा : ई पॉज मशीन तहसीलदारांच्या कडे जमा करताना जावली तालुक्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेचे पदाधिकारी
जावली तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी ई पॉज मशीन केल्या तहसीलदारांच्या कडे जमा...
वाटप बंद मशीन चालू होईपर्यंत जनता रेशनिंग विना
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
रेशनिंग वाटण्यासाठी असलेल्या ई पॉज मशीन सर्व्हर डाउन असल्याने बंद पडल्या असून तालुक्यात जुलै महिन्याचे फक्त पन्नास टक्के धान्य वितरण झाले आहे मशीन बंद पडत असल्याने धान्य वाटता येत नाही मशीनवीना धान्य वाटप करायचे तर शासन आदेशानुसार वाटप करताना शासनाचा माणूस पाहिजे,शासनाचा माणूस आला तर ग्राहक आले पाहिजेत अशा अवस्थेत रेशनिंग दुकानदार धान्याचे वाटप कसे करणार म्हणून जावली तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांनी धान्य वाटपासाठी असलेल्या ई पॉज मशिन्स तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्याकडे जमा केल्या व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की ई पॉज मशीन मधील तांत्रिक अडचणी सर्व्हर व नेटवर्क समस्या यामुळे ई पॉज मशीन शासनाकडे तात्पुरत्या स्वरुपात जमा करत आहोत. गेल्या १२ ते १५ दिवसापासून सर्व्हर समस्या मोठ्याप्रमाणात उद्भवली आहे. तसेच पॉज मशीनला रेंन्ज येत नाही. नेटवर्कमध्ये अनेक अडचणी येत आहेत. यामुळे धान्य वाटप पूर्णतः बंद पडलेली आहे. ग्राहक धान्यासाठी दररोज दुकानामध्ये हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे ग्राहक व दुकानदार यामध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. नेटवर्क व्यवस्थित नसल्याने पॉज मशीन बंद आहे. ग्राहकांना धान्य वितरण वेळेत करणे दुकानदारांना शक्य होत नाही. सर्व्हर व नेटवर्क समस्येमुळे माहे जुलै २०२४ चे धान्य वाटप दुकानदारांचे ५० टक्केंपेक्षा
जास्त ग्राहकांना धान्य वाटपाचे राहिले आहे.
जुलै व ऑगस्ट २०२४ चे धान्य वाटप एकाच पावतीवर म्हणजेच एकच अंगठा घेऊन
पावती निघणे आवश्यक आहे सध्या शासनाने प्रत्येक कार्ड धारकाची ई के.वाय.सी. करण्याचे काम दुकानदारांना सांगण्यात आलेले आहे. प्रत्येक दुकानदारास ई के.वाय.सी. साठी प्रति व्यक्तीस रु पन्नास याप्रमाणे मोबदला मिळावा. नागरी सुविधा केंद्रामध्ये याच कामासाठी प्रति व्यक्ती १०० रु घेतले जातात. राज्य संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार सर्व व्यवस्था सुरळित होईपर्यंत संपुर्ण
महाराष्ट्रातील रेशन दुकानदार ई पॉज मशीन तात्पुरत्या स्वरुपात शासनाकडे जमा करीत आहोत. सर्व्हर नेटवर्क समस्या दूर झाल्यानंतर सदरच्या ई पॉज मशीन आम्ही परत घेऊन
जाणार आहोत. तसेच ग्राहकांना धान्य वाटप करणार आहोत. दुकानदारांच्या वरील मागणींचा सहानभुतीपुर्वक विचार करून आम्हां सर्व दुकानदारांना योग्य न्याय मिळावा. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी जावली तालुका रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भिलारे, उपाध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष किशोर शहा खजिनदार प्रदीप आढाव सेक्रेटरी संजय शेलाटकर यांच्यासह जावली तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदार उपस्थित होते.