मैत्री ग्रुपच्यावतीने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना ग्रुपचे सदस्य
मैत्री ग्रुपच्यावतीने जावलीत शैक्षणिक साहित्याचे वाटप ;
मुलांच्या चेहऱ्यावरचा फुलला आनंद
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )
मैत्री ग्रुप जावली यांच्यावतीने जावली तालुक्यातील डोंगर माथ्यावरील शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये रेनकोट, दफ्तर, पट्टी ,पेन्सिल, वह्या याचा समावेश होता. शाळेचा पहिला दिवस होता आणि मुलांना अनपेक्षित पणे या गोष्टी मिळाल्या हे सर्व पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आणि हे सर्व पाहून मैत्री ग्रुप जावलीच्या सर्व सदस्यांना धन्यवाद दिले . तसेच मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी या विभागातून फिरताना लोकांना काय समस्या आहेत ते जाणून घेतले आणि कसलीही मदत लागली तर मैत्री ग्रुप नेहमी तुम्हाला सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
त्याच प्रमाणे पिंपळबन बामणोली येथे मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने २०० विविध प्रकारची झाडे लावण्यात आली .या प्रसंगी . बामणोली ग्रामस्थ उपस्थित होते . मैत्री ग्रुप चे उपाध्यक्ष रविराज परामणे व रवि दळवी तसेच मैत्री ग्रुप चे ग्रामीण प्रमुख वैभव पवार व सदस्य बहुसंखेने उपस्थित होते.