मुकवली गावाने धार्मिक परंपरा जोपासत एकीने केलेली आदर्श गावाकडे वाटचाल कौतुकास्पद - राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

0

 


मुकवली - मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे स्वागत करताना आर. डी. पवार समवेत ग्रामस्थ


मुकवली गावाने धार्मिक परंपरा जोपासत एकीने केलेली आदर्श गावाकडे वाटचाल कौतुकास्पद - राज्यपाल राजेंद्र आर्लेकर


केळघर : प्रतिनिधी- ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

 जावळी तालुक्यातील मुकवली या छोट्याशा गावातील ग्रामस्थांची एकी कौतुकास्पद आहे. गावाने धार्मिक परंपरा जोपासली असून एकीच्या जोरावर मुकवली गावची वाटचाल आर डी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गावाकडे चाललेली असून मुकवली गावाचा आदर्श घेऊन आपले गाव आदर्श करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत ,असे आवाहन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

मुकवली (ता .जावळी) येथे आज श्री. काळभैरवनाथ व श्री. जोगेश्वरी माता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभुदेव शिवाचार्य महाराज, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, उद्योजक आर. डी. पवार,प्रकाश दळवी,मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर,महाबळेश्वर चे सपोनि यशवंत नलावडे, तलाठी संदीप ढाकणे ,आदिनाथ ओंबळे, प्रा. तुकाराम ओंबळे ,अविनाश कारंजकर,उपसरपंच साहेबराव पवार, आदींची उपस्थिती होती. प्रभुदेव शिवाचार्य महाराज म्हणाले, आदर्श व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी अध्यात्माची कास धरावी. तसेच धर्मानुरूप आचरण करावे, असे आवाहन केले.प्रारंभी प्रभुदेव शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते श्री.काळभैरवनाथ व श्री. जोगेश्वरी मातेच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी माहेरवाशिणी, ग्रामस्थ उपस्थित होते. आर. डी. पवार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस पाटील संजय पवार, दिपक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेेच   ग्रामस्थानी परिश्रम घेतले .

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)