अनुष्का गोंजारीने शालेय जिमॅस्टिकमध्ये साधला सुवर्णवेध

0

 


नवी दिल्ली: राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण यश मिळविनारी अनुष्का गोंजारी व मार्गदर्शक शिक्षक.

अनुष्का गोंजारीने शालेय जिम्नॅस्टिकमध्ये साधला सुवर्णवेध

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - वाई येथील अनुष्का तानाजी गोंजारी हिने नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम वर नुकत्याच झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये वैयक्तिक गटात कांस्य पदक व सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

अनुष्का ही महाबळेश्वर आगारातील वाहक तानाजी गोंजा री यांची सुकन्या आहे.  अनुष्का ही छत्रपती संभाजीनगर येथील मिलींद मल्टी पर्पझ हायस्कूल ची विद्यार्थीनी असून ती आठवीच्या वर्गात शिकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तानाजी गोंजारी यांनी आपली कन्या अनुष्काला जिमॅस्टिकचे प्रशिक्षण मिळवून दिले आहे. अनुष्काला पिंकी डेब व संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पातळीवर अनुष्काने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल तिचे मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)