ह भ प दत्तात्रय महाराज कंळबे यांचे सहकारातील योगदान सदैव प्रेरणादायी : वसंतराव मानकुमरे

0

 


ह भ प दत्तात्रय महाराज कंळबे यांचे सहकारातील योगदान सदैव प्रेरणादायी : वसंतराव मानकुमरे 


पाचगणी : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - जावली तालुक्यातील बेलोशी सारख्या छोट्याशा गावामध्ये सहकारातील मानबिंदु जावली सहकारी बॅकेचे छोटस लावलेले रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे . जावलीतील कष्टकरी जनतेच्या आर्थीक समृद्धी करीता ह भ प दत्तात्रय महाराज कंळबे यांचे सहकारातील योगदान सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी बेलोशी येथे ह भ प दत्तात्रय महाराज कंळबे यांच्या २२ व्या पुण्यस्मरणावेळी  म्हणाले . 

  

 जावलीच्या कष्टकरी जनतेच्या आर्थीक उद्धाराच शिवधनुष्य पेलत असताना ह भ प दत्तात्रय महाराज कंळबे यांनी आपले जीवन समर्पीत केले . ह भ प दत्तात्रय महाराज कंळबे यांचे अध्यात्माची विचाराधारा बेलोशी या गावामध्ये निर्माण झाली अन् अध्यात्मा बरोबर सहकाराच जाळ तयार करण्यात ह भ प दत्तात्रय महाराज कंळबे यांनी सदैव प्रयत्न केले . 

 यावेळी चेअरमन विक्रम भिलारे व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी , प्रतापगड सहकारी कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे , व्हाईस चेअरमन अॅड मर्ढेकर , कृषी उत्पन्न् बाजारा समीती चेअरमन जयदिप शिंदे , माजी उपसभापती हणमंत पार्टे .हिदुराव तरडे , बाळासाहेब भालेघरे , विश्वनाथ धनावडे , प्रकाश म्हस्कर ,राजु गोळे , विजय शेलार , नितीन गावडे आदि उपस्थित होते .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)